… तर वडूज शहरास विकासाचं रोल मॉडेल बनवणार : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

नगरपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांना निवडून दिल्यास वडूज शहरास विकासाचं रोल मॉडेल बनवून राज्य भरात नावलौकिक वाढवणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे सहकार पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी वडूज ता खटाव येथील नगरपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रचार सभेत केले.

    दहिवडी : मागील पंचवार्षिक काळात वडूज नगरपंचायतच्या माध्यमातून शहरात विविध विकास कामं करण्यात आली असून कोरोना मुळे बहुतांश प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या. त्यातून ही मार्ग काढत माजी आयुक्त प्रभाकर देशमुखांनी विश्वासु कार्यकर्त्यांची एकसंघ फळी नव्याने उभी करून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सतत पाठपुरावा केला व वडूज मध्ये तालुक्यातील कोरोना ग्रस्तांना दिलासादायक असं जम्बो कोविड सेंटर उभं केलं. तसेच नगरपंचायत कार्यालय तोकडी इमारत असल्याने वडूज शहरातील वाढती लोकसंख्या पहाता त्या ठिकाणी नागरिकांची होणारी गर्दी, वाहनांसाठी अपुरी व्यवस्था आदी समस्या लक्षात घेता येथील जुनं तहसील कार्यालयात नविन जागा मिळवून दिली. या नगरपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांना निवडून दिल्यास वडूज शहरास विकासाचं रोल मॉडेल बनवून राज्य भरात नावलौकिक वाढवणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे सहकार पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी वडूज ता खटाव येथील नगरपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रचार सभेत केले.
    यावेळी खटाव माण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, प्रा अर्जुनराव खाडे, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, माजी सभापती संदीपदादा मांडवे, जितेंद्र दादा पवार,नंदकुमार मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती

    यावेळी माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी, जम्बो कोविड सेंटर झाल्यावर अनेकांनी हे सेंटर म्हणजे फुकट पोसलेला पांढरा हत्ती आहे, अशी टीका केली, मात्र संभाव्य परिस्थिती लक्षात घेता अजूनही कोरोना संपूर्ण पणे गेलेला नाही, कधीही या सेंटर ची लोकांना गरज पडू शकते असं सांगून वडूज हे तालुक्याचं ठिकाण आहे, या शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून निश्चितच करता येणार आहे. त्यासाठी पक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून देणं गरजेचं असल्याचं सांगितले.या प्रचार सभेत जि प सदस्य सुरेंद्र गुदगे, संदीप मांडवे,नंदकुमार मोरे,विजय काळे,पृथ्वीराज गोडसे आदींनी मनोगत व्यक्त केले.

    सूत्रसंचालन विनायक खाडे यांनी तर माजी उपनगराध्यक्ष विपुल गोडसे यांनी आभार मानले.सभेस तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, वडूज मधील सर्व उमेदवार, मतदार आदींची उपस्थिती होती.