वाई तहसीलदार व धोम पाटबंधारे विभागाचा अतिक्रमणाला छुपा पाठिंबा : संतोष जाधव

वाई तहसीलदार व पाटबंधारे विभागाचा छुपा पाठिंबा व मूक संमती मिळत असल्यामुळेच धोमधरण व बलकवडी धरण पाणलोट क्षेत्राच्या परिसरात नियमबाह्य भरती आलेल्या अनधिकृत हॉटेल बांधकामावर तात्काळ कारवाई करावी.

    वाई : धोमधरण जलाशयाच्या क्षेत्रामध्ये धरणाच्या भिंतीलगतच वाई महसूल वरदहस्ताने प्रशासकीय व पाटबंधारे विभागाचे नियमधाब्यावर बसवून बेकायदेशीर अतिक्रमणाला उधाण आले आहे. वाई तहसीलदार व पाटबंधारे विभागाचा छुपा पाठिंबा व मूक संमती मिळत असल्यामुळेच धोमधरण व बलकवडी धरण पाणलोट क्षेत्राच्या परिसरात नियमबाह्य भरती आलेल्या अनधिकृत हॉटेल बांधकामावर तात्काळ कारवाई करावी. अन्यथा प्रजासत्ताक दिनी आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.

    धोम पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाच्या नियमांना अक्षरश सुरुंग लावत संबंधित धनिकाने धोम जलाशय हद्दीतच चक्क हॉटेल व स्विमिंग पूल बांधला आहे. सदर हॉटेलच्या अतिक्रमणाविरोधात नोटिसा व पंचनाम्यांचा केवळ बेबनाव करून वाई तहसीलदार रणजित भोसले वाईकर जनता व प्रशासनाची सरळपणे दिशाभूल करत असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) तालुका अध्यक्ष संतोष जाधव यांनी निवेदनाद्वारे केला असून सदरचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

    संबंधित धनिकाने चक्क धोमधरण भिंती लगतच्या पाणलोट क्षेत्रालगतच 111/1 सर्व्हे नंबरमध्ये महसूल,धोम पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियम पायदळी तुडवत मुख्य रस्ता ते धरण पाणीसाठा अखेरपर्यंत अतिक्रमण करून जलाशयात व रस्त्यावर दांडगाई केली आहे. वाईतील अनेक संघटना व नागरिकांच्या तक्रारी नंतर वाई सार्वजनिक बांधकाम विभाग व धोम पाटबंधारे विभागाने वेळोवेळी नोटीस काढून सुध्दा धोमधरण पाणलोट क्षेत्रात धनिकाचे हॉटेल बेकायदेशीर अतिक्रमण बोकाळले आहे.

    तर दुसरीकडे अतिक्रमण हा विषय धोम पाटबंधारे विभागाचा विषय असे सांगत सदर अतिक्रमणाच्या विरोधात आजपर्यंत गांधागिरीची भूमिका वटवणारे वाई तहसीलदार रणजित भोसले यांचा धोमधरण पाणलोट क्षेत्रामधील हॉटेल अतिक्रमणला मूक संमतीने पाठिंबा मिळाल्यानेच धोम जलाशयात जाधव यांनी प्रशासनाला दिला आहे.