आता यांचे काय करायचे ? माकडांचा उच्छादाने सातारकर हैराण

सातारा : कास, बामनोली, ठोसेघर, यवतेश्वर या डोंगरी भागात सध्या खाण्याची वानवा असल्यामुळे या जंगल परिसरातून बिबट्या, रानगवे यांच्यासह आता माकडांच्या टोळ्या ही सातारा शहरात येऊ लागले आहेत .त्यामुळे शहराच्या पश्चिम भागात असणाऱ्या मोरे कॉलनी, आरे दरे, मंगळवार पेठेतून आता अगदी गाव भागात म्हणजे यादोगोपाळ पेठेत माकडांच्या टोळ्या येऊन दिवसभर उच्छाद मांडत आहेत.

वानरे समजले जाणारे हे जंगली माकडांचे प्रकार सध्या सातारा वासियांना उच्छाद मांडून त्रास देत आहेत. उंच घरावरील लांबच लांब टाकण्यात आलेल्या केबल टीव्हीच्या वायरिंगवरून माकड चाळ्यांची दृश्य व घराच्या गॅलरीत बालकनीत ठेवलेले वाळवणीचे पदार्थ किंवा एखाद्या घराच्या खिडकीतून आत प्रवेश करून थेट खाण्याच्या पदार्थांवर मारलेला डल्ला यामुळे या टोळ्या सातारकरांना हैराण करून सोडत आहेत. सुमारे २० ते २५ जणांची टोळी अक्षरशः बेभान होऊन खाण्यासाठी सैरभैर करत या गल्लीतून त्या गल्लीत आणि या घरावरून त्या घरावर जोराच्या उड्या मारत अचानपणे हल्लाबोल करत आहेत. दुपारच्यावेळी आधीच थंडीने गारठलेल्या सातारकरांना आता हा त्रास सहन करत या माकड टोळ्यांना हुसकावून लावावे लागत आहे. नाहीतर या प्राण्याकडून केले जाणारे नुकसान हे अक्षरश: भरून काढता येण्यासारखे सुद्धा नाही.

नुकसान कोणाकडून भरून मागायचे ?
अनेक घरातून भाकरीच्या चवडी पळवत या माकडांनी मारलेला येथेच्छ ताव व तोडलेल्या केबल वायर यामुळे आता या प्राण्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी सातारकर करीत आहेत. झालेल्या नुकसानीचा अंदाज पाहता हे नुकसान कोणाकडून भरून मागायचे असा प्रश्नही सातारकरांना पडत आहे. त्यामुळे पुण्यात येऊ घातलेल्या रानगाव यानंतर आता सातारकर मात्र या मोकाट वानरांच्या टोळ्यांनी हैराण झाले असून पालिकेच्या अतिक्रमण विभागाने या टोळ्यांना लवकरात लवकर पकडून लांब जंगलात नेऊन सोडावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.