‘काम कोणाच, नाचतय कोण!’, खासदार उदयनराजे  व आमदार शिवेंद्रराजे यांच्यात रंगली पोस्टरबाजी

या पोस्टरबाजीमुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सातारा नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राजे एकत्र लढणार नसल्याचं स्पष्ट झाला आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच उदयनराजे भोसले यांनी नगरपालिकेत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले होते.

    साताऱ्यातील भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (MP Udayan Raje Bhosale)व आमदार शिवेंद्रराजे भोसले (MLA Shivendra Raje bhosale) यांच्यातील वाद सर्वांनाच परिचित आहे. दोघेही सातत्याने एकमेकांवर कुरघोडी करताना दिसून येतात. अशातच विकास कामाच्या श्रेयावरून दोन्ही राजेंनी एकमेकांविरोधात पोस्टरबाजी (Poster fights) सुरु असल्याचे समोर आले आहे.

    सातारा महानगरपालिका निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. मात्र आगामी निवडणुका लक्षात घेत , विकास कामांच्या शुभारंभाचा धडाका सुरु केला आहे. यातूनच एकमेकांच्या विरोधात पोस्टरबाजी सुरु केली आहे . दोन्ही राजे सातारचा विकास कोणी केला याचं श्रेय घेण्यासाठी आमने सामने आले आहेत.

    आज उदयनराजेंनी पोवई नाका ते वाढे फाटा या रस्त्याचा शुभारंभ केला. त्यानंतर लगेच नगरविकास आघाडीकडून ज्या ठिकाणी उदयनराजे यांनी केलेल्या शुभारंभाचा बोर्ड लावला त्याशेजारी बोर्ड लावला आहे. यामध्ये पोवईनाका ते वाढे फाटा रस्ता आमदार शिवेंद्रराजे यांच्या प्रयत्नातून झाला असल्याचा मजकूर या बोर्डावर टाकण्यात आलेला आहे.

    या पोस्टरबाजीमुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सातारा नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राजे एकत्र लढणार नसल्याचं स्पष्ट झाला आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच उदयनराजे भोसले यांनी नगरपालिकेत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले होते. ‘सातारा विकास आघाडी केवळ आश्वासन देत नाही तर आम्ही शब्द देतो आणि तो पाळतो’ असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी खोचक टोला नगरविकास आघाडीला म्हणजेच आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना लगावला होता.