शरद पवारांची सीरम इन्स्टिट्यूटला भेट

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल ( शनिवारी) सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. कोरोना प्रतिबंधात्मक लस काढण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफर्डसोबत मिळून तयार केलेल्या लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल ( शनिवारी) सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. कोरोना प्रतिबंधात्मक लस काढण्यासाठी सीरम  इन्स्टिट्यूटने ऑक्सफर्डसोबत मिळून तयार केलेल्या लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पवारांनी इन्स्टिट्यूटला भेट देऊन मांजरी येथील लशीच्या मुख्य प्रकल्पास भेट देऊन त्याची पाहणी केली.

सध्या कोरोनावर लस शोधण्यामध्ये अनेक देशांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. अनेक देश याबाबत संशोधन देखील करत आहेत. या लस निर्मितीच्या स्पर्धेत पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने देखील उडी घेतली असून त्यांनी जगातील सात कंपन्याशी लशीच्या संशोधन, उत्पादन प्रक्रियेसाठी भागीदारी केली आहे. त्या भागीदाराच भाग म्हणून त्यांनी विकसित केलेली लस ही अंतिम टप्प्याकडे असली तरी त्याला अद्याप डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, असे डॉ. सायरस आणि आदर पूनावाला यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते.