थकबाकीदारांनी भरली १ कोटीची थकबाकी : दिलीप स्वामी

    सोलापूर : जिल्ह्यात ग्रामपंचायतीमध्ये घरपट्टी थकलेल्या थकबाकीदारांनी एकाच दिवसात १ कोटी रूपये भरले आहेत. लोकअदालतच्या धसक्याने १ कोटी जमा तर दोन कोटींची हमी मिळाल्यामुळे ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध झाला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

    महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधीकरणाने ग्रामपंचायतीमधील थकीत पाणीपट्टी व घरपट्टी भरण्याचे आदेश दिले होते. २५ सप्टेंबर रोजी लोकअदालत घेण्यात आली. जिल्ह्यातील १०२३ ग्रामपंचायतींमध्ये ७ हजार ६५४ दावे लोकअदालतीमध्ये दाखल झाले होते. सदर दाव्यामध्ये वसुलीची रक्कम २९ कोटी ७५ लाख ८ हजार ८८५ इतकी होती. अदालतीपूर्वी ५८ लाख रूपये ७ हजार ५७१ रूपये जमा झाले तर लोक अदालतीमघ्ये ९० लाख ९० हजार ७९५ रूपये जमा झाले.

    तडजोड नाम्यामघ्ये १३२९ खातेदारांनी २ कोटी २ लाख ६६ हजार २११ रूपये भरणेची हमी दिली आहे. सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत तसेच उपमुख्य कार्यकारी इशाधीन शेळकंदे व त्यांच्या टीमने खूप मेहनत घेतल्यामुळे ही वसुली झाली आहे.

    लोकअदालतला चांगला प्रतिसाद : इशाधीन शेळकंदे

    सोलापूर जिल्ह्यात लोकअदालतला चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हा विधी सेवा प्राधकरणाची चांगली साथ मिळाली आहे. जिल्हयात सर्वाधिक 7 हजार ६५४ प्रकरणे दाखल झाल्यामुळे वसुली झाली असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे यांनी सांगितले.