आंबळे ग्रामपंचायतच्या ९ जागेसाठी २८ अर्ज दाखल

पुरंदर तालुक्यातील पुर्वेस असणाऱ्या आंबळे ग्रामपंचायतीची निवडणुक येत्या १५ जानेवारीला होत आहे आंबळे ग्राममपंचायतीची सदस्य संख्या ही ९ आहे परंतु ९ जागेसाठी तब्बल २८ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

 

माळशिरस: ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. पुरंदर तालुक्यातील पुर्वेस असणाऱ्या आंबळे ग्रामपंचायतीची निवडणुक येत्या १५ जानेवारीला होत आहे आंबळे ग्राममपंचायतीची सदस्य संख्या ही ९ आहे परंतु ९ जागेसाठी तब्बल २८ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर पर्यत अर्ज स्विकारण्याची मुदत होती. २३ ते २७ डिसेंबरपर्यत कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नव्हता.दि.२८ रोजी ३ अर्ज,दि.२९ रोजी ७ अर्ज,आणि आज दि.३० रोजी १८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.आज दि. ३० डिसेंबर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत ग्रामपंचायतीच्या ९ जागेसाठी एकुण २८ अर्ज दाखल झालेले आहेत.