सोलापूर महानगरपालिकेतील २९ कर्मचाऱ्यांवर निलंबन अन् सेवासमाप्ती कारवाई

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सोलापूर महापालिका (Solapur Municipal Corporation) आरोग्य विभागातील १२ कायम कर्मचारी निलंबित तर २३ मानधनावरील आणि ६ रोजंदारी अशा २९ जणांवर सेवासमाप्तीची कारवाई झाल्याने महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी ही कारवाई केली.

    महापालिकेच्या मलेरिया विभागातील दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी मोबाईलमध्ये विआटॅग ऍप घेण्यास वारंवार सांगूनही हे ऍप घेतले नाही. विआ रँगमध्ये कामकाज पाहण्यासाठी परिपत्रकही काढण्यात आले होते. आरोग्य अधिकारी यांनी बैठक घेवून हे व्हॉट्सऍप ऍप घेवून ते चालू स्थितीत ठेवण्यासाठीच्या सूचना दिल्या होत्या. मोबाईल घेण्यासाठी ऍडव्हान्स रक्कम उपलब्ध करून दिला असता काही जणांनी ऍडव्हान्स घेतला पण मोबाईल घेतला नाही.

    या एकूणच प्रकाराबाबत संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पण काहींनी नोटीस घेण्यास नकार दिला तर काहींनी नोटीसीला उत्तरच दिले नाही. या एकूणच प्रकारावरून मनपा आयुक्तांनी आरोग्य विभागातील १२ कायम कर्मचारी निलंबित तर २३ मानधनावरील आणि ६ रोजंदारी अशा २९ जणांवर सेवासमाप्तीची कारवाई केली आहे.

    सीईओ स्वामी यांच्याकडून कारवाई

    बार्शी पंचायात समितील कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सीईओ दिलीप स्वामी यांनी एक दिवसीय विना वेतन कारवाई केली आहे. वैद्यकिय अधिकारी एस.एम. पाटील, डॉ.ए.एस.बांगर, आरोग्य सहाय्यक गर्जे, ग्रामसेविका पी.एच.पोळ यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.