शिवामृत दूध संघाची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा; सातत्याने दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांचा सन्मान

  अकलूज : येथील शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाची ४६ वी अधिमंडळाची ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी संस्थेशी एकनिष्ठ राहून सातत्याने दुध पुरवठा करणाऱ्या संस्थांचा सन्मान करण्यात आला.

  विजयनगर येथील शिवामृत दुध उत्पादक सहकारी संघाची ४६ वी अधिमंडळाची ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा संघाचे विजयनगर येथील कार्यालयात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली. प्रारंभी संघाचे कार्यकारी संचालक रविराज इनामदार यांनी अहवाल वाचन करुन वार्षिक सभेसमोरील १ ते ९ विषयांचे वाचन केले. त्यास सभासदांनी ऑनलाईन मंजुरी दिली.

  अहवालसालात शिवामृत दुध संघास सर्वाधिक दूध पुरवठा, पशुखाद्य खरेदी व सातत्याने २५ वर्ष संघास दुध पुरवठा करणाऱ्या संस्थाचा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याहस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, फेटा, शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक सिध्दनाथ दुध संस्था तामशिदवाडी, द्वितीय क्रमांक छत्रपती दूध संस्था साळुंखेवस्ती मांडवे, तृतीय क्रमांक श्री शंकर दूध संस्था सदाशिवनगर, प्रथम क्रमांक शिवामृत दूध संकलन केंद्र मानेवस्ती कोंडबावी, द्वितीय क्रमांक शिंदेवस्ती मांडवे तर तृतीय क्रमांक मोरोची.

  पशुखाद्य खरेदीमध्ये प्रथम क्रमांक पद्मजादेवी दूध संस्था पिसेवाडी, द्वितीय क्रमांक मळोली दूध संस्था मळोली तर तृतीय क्रमांक दत्तप्रताप दूध संस्था डोंगरवाडी लोणंद. संकलन केंद्रात जाधवस्ती काळमवाडी या केंद्रास द्वितीय क्रमांक देण्यात आला. कोळेगाव येथे ऑनलाईन सेंटर चालविणारे व दैनंदिन १ हजार २०९ लिटर दूध पुरवठा करणारे राहुल सावंत यांना दहा हजार रुपयांचे पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले.

  शिवमृत दूध उत्पादक सहकारी संघास सतत २५ वर्षे दुध पुरवठा करणाऱ्या जयसिंह पळसमंडळ, धवलश्री धवलनगर, माऊली लवंग, महात्मा फुले सवतगांव, सत्यशिल आनंदनगर, धैर्यशील वटपळी व जय विजय इस्लामपूर या सहकारी दुध व्यावसायिक संस्थाचा सत्कार करण्यात आला.

  या वार्षिक सर्वसाधारण सभेस संघाचे संचालक रणजितसिंह मोहिते पाटील, व्हा. चेअरमन सावता ढोपे, दत्तात्रय भिलारे, दत्तात्रय अवताडे, भीमराव साळुंखे, उध्द्ववराव जाधव, विठ्ठल जाधव, नवनाथ निलटे, अशोक भांगे, हनुमंत शिंदे, राजेंद्र देशमुख, विजय नरुटे, संग्रामसिंह रणनवरे, संजय मोरे, दादासाहेब शिंगाडे, लक्ष्मण पवार, जगन्नाथ खुडे, शारदा पिसे, नंदाबाई मगर, रुपाली जाधव यांच्यासह सभासद ऑनलाईन उपस्थित होते. आभार संघाचे संचालक हरिश्चंद्र मगर यांनी मानले.

  याच कार्यस्थळावर विजयरत्न सहकारी पशु-पक्षी संवार्धन संघ मर्या. शंकरनगर-अकलूज व रत्नप्रभादेवी मोहीते-पाटील बिजोत्पादक सहकारी संस्था मर्या. अकलूज या संस्थांच्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभाही पार पङल्या. विजयरत्न संघाचे विषय वाचन कार्यकारी संचालक रविंद्र जवळेकर यांनी केले. सर्व विषयांना सभासदांनी एकमुखाने मंजुरी दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दत्ताञय भिलारे, उपाध्यक्ष शहाजी धायगुङे, संचालक आण्णासो कदम, मधुकर कुलकर्णी, मानसिंग मोहीते, मोहन लोंढे, हर्षाली निंबाळकर उपस्थित होते.

  रत्नप्रभादेवी संस्थेच्या सभेत विषय वाचन मॅनेजर दिलीप शिरसट यांनी केले. सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. यावेळी चेअरमन विलास क्षीरसागर, व्हा. चेअरमन हनुमंत सरगर, संचालक संदिप बोरावके, इंद्रराज दोशी, पुष्पलता पाटील, रविंद्र पाटील, सचिन सावंत, सुजित तरंगे, महादेव सावळे, सागर यादव, बाळासाहेब कदम, नागनाथ पराङे-पाटील उपस्थित होते.