बोरामणी सशस्र दरोड्यातील सहा आरोपी अटकेत

बहुचर्चित दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील दरोडा प्रकरणातील सहा आरोपीना अटक करण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश मिळाले आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली.

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बहुचर्चीत दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील दरोडा प्रकरणातील सहा आरोपीना अटक करण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश मिळाले आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली.

    याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. या गुन्ह्यातील अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती सातपुते यांनी दिली.वैभव ऊर्फ भोरड्या एकनाथ काळे (रा. फकराबाद जि. अहमदनगर), चालक संतोष झोडगे (रा. डोकेवाडी ता. भूम जि. उस्मानाबाद), अजय देवगण ऊर्फ देवगण सपा शिंदे, सुनिल ऊर्फ गुल्या सपा शिंदे (दोघे रा. शेळगांव ता. परांडा जि. उस्मानाबाद), ज्ञानेश्वर लिंगू काळे (पांढरेवाडी ता. परांडा जि. उस्मानाबाद), विकास भोसले (डोकेवाडी ता. भूम जि. उस्मानाबाद) अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

    दरोड्यातील अक्षय काळे (रा. पिंपळगांव ता. जामखेड जि. अहमदनगर), अनूज ऊर्फ नागनाथ भोसले (रा. डोकेवाडी ता. भूम जि. उस्मानाबाद) हे दोघे फरार आहेत. विकास भोसले हा दरोड्याचा मुख्य सूत्रधार आहे.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण फूगे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे पोलिस निरीक्षक अतुल भोसले, अंकुश माने, सत्यजीत आवटे, नागनाथ खुणे, प्रविण सपांगे, फौजदार शैलेश खेडकर, सुरज निबांळकर, सहायक फौजदार ख्वाजा मुजावर, राजेश गायकवाड, श्रीकांत गायकवाड, नारायण गोलेकर, प्रकाश कारटकर, धनाजी गाडे, बापू शिंदे, सलीम बागवान, आबा मुंडे, मोहन मन्सावले, विजयकुमार भरले, हरिदास पांढरे, रवी माने यांनी केली.