तीन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोटारसायकल चोरीचे ६ गुन्हे उघड, सराईत मोटारसायकल चोरास अटक

आरोपीस ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता. त्याने विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील २ , सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३ आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १ अशा ३ लाख ७० हजाराच्या ६ मोटारसायकली चोरल्याचे कबूल केले. अन्य एक मोटरसायकल चोरी बाबत पोलीस माहिती घेत असून या आरोपी कडून आणखी गुन्हे उघड येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

    सोलापूर – विजापूर नाका पोलिस स्टेशन,  सदर बाजार पोलिस स्टेशन आणि एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील असे एकूण सहा गुन्हे उघड करण्यात विजापूर नाका डीबी पथकाला यश आले असून त्यांनी सराईत आरोपी कडून ७ दुचाकीसह ३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

    पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिस कॉन्स्टेबल इमरान जमादार आणि आतिश पाटील यांनी आसरा चौक होडगी रोड येथे आलेल्या संशयित मोटरसायकल चोर नितीन उर्फ निखील मारुती कांबळे वय ३२ रा. आदित्य नगर, विजापूर रोड सोलापूर याला मोटरसायकल चोरताना रंगेहाथ पकडलं.

    यासंदर्भात बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हानपुडे म्हणाले की, “या आरोपीची गाड्या चोरण्याची एक पध्दत आहे. हा आरोपी एखादी गाडी चोरल्यावर ती काही दिवस दुसखाद्या ठिकाणी ठेवतो आणि नंतर मग एकादा माणूस बघून त्याला विकतो. महत्वाचं म्हणजे हा एकटाच गाड्या चोरायचा आणि विकायचा. आम्ही आरोपीची आणखी चौकशी करत आहोत. आम्हाला खात्री आहे त्याच्याकडून आणखी चोरीच्या गाड्यांची माहिती लवकरच मिळेल.”