धक्कादायक ! पतीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने पत्नीची रेल्वेखाली येऊन आत्महत्या

पतीच्या निधनाचा धक्का पत्नी अनुसया कोरे यांना बसला. हा धक्का सहन न झाल्यामुळे त्यांनी सोलापूर-पुणे या रेल्वे मार्गावर जाऊन रेल्वेच्या खाली आत्महत्या केली आहे. हा प्रकार आज सकाळी सोलापूरात रेल्वेस्टेशन भैय्याचौक बोगद्याजवळ घडला.

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : पतीच्या निधनानंतर पत्नीने रेल्वे खाली येऊन आत्महत्या (Suicide on Rail Track) केल्याची घटना सोलापूरात घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

    मयत दाम्पत्य मंगळवेढा तालुक्यातील शरदनगर (मल्लेवाडी) येथे राहत होते. आप्पासाहेब रावसाहेब कोरे (वय 38) आणि अनुसया आप्पासाहेब कोरे (वय 33) अशी दाम्पत्याची नावे आहेत.

    पोलिसांकडून माहिती अधिक अशी, मागील आठ दिवसांपूर्वी मृत आप्पासाहेब कोरे यांना निमोनिया आजार असल्यामुळे सोलापूर येथील यशोधरा या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आप्पासाहेब कोरे यांचे बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास निधन झाले.

    दरम्यान, पतीच्या निधनाचा धक्का पत्नी अनुसया कोरे यांना बसला. हा धक्का सहन न झाल्यामुळे त्यांनी सोलापूर-पुणे या रेल्वे मार्गावर जाऊन रेल्वेच्या खाली आत्महत्या केली आहे. हा प्रकार आज सकाळी सोलापूरात रेल्वेस्टेशन भैय्याचौक बोगद्याजवळ घडला आहे. तर, या दापत्यांना 7 वर्षांचा मुलगा आहे. झालेला भरमसाठ खर्च आणि त्यात पतीच्या निधनाचं वृत्त ऐकून त्यांना धक्का बसला. यातच त्यांनी सोलापूर रेल्वेस्टेशन नजीक रेल्वे रुळावर पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या गाडीखाली स्वतः आत्महत्या केली. अनुसया यांचे सासू-सासरे, दीर आधीच मृत पावले आहेत.

    दरम्यान, या घटनेमुळे मंगळवेढा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस अधिकारी प्रल्हाद चव्हाण करत आहेत.