प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

गोवा राज्यात विक्रीस असलेल्या विदेशी मद्याची वाहतूक करणारी टाटा झेनॉन पिकअप जीप क्र.एम.एच.०४.जी.सी.९७७३ व एम.एच.१३.ए.झेड.८४४२ हि वाहने गोवा राज्यात विक्रीस असलेल्या विदेशी मद्याच्या १८० मिलीच्या २३५२ बाटल्या व ६५० मिलीच्या ६२४ बाटल्यासह घेऊन जात होते.त्यावेळी पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून केला.

    सोलापूर : विदेशी मद्य विक्रीस जाणाऱ्या वाहतुकीवर कारवाई करत ११ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की,गोवा राज्यात विक्रीस असलेल्या विदेशी मद्याची वाहतूक करणारी टाटा झेनॉन पिकअप जीप क्र.एम.एच.०४.जी.सी.९७७३ व एम.एच.१३.ए.झेड.८४४२ हि वाहने गोवा राज्यात विक्रीस असलेल्या विदेशी मद्याच्या १८० मिलीच्या २३५२ बाटल्या व ६५० मिलीच्या ६२४ बाटल्यासह घेऊन जात होते.त्यावेळी पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून केला.हि कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दि.१९ डिसेंबर रोजी आली,ता.मोहोळ,जि.सोलापूर व कोळेगाव ता.मोहोळ,जि.सोलापूर या ठिकाणी सापळा रचुन करण्यात आली.या गुन्ह्यात सोमनाथ सुधाकर भोसले (वय-१९रा. खवणी,ता.मोहोळ,जि.सोलापूर) ज्ञानेश्वर धर्मा उन्हाळे,(वय-१९,रा.पोखरापूर,ता.मोहोळ,जि.सोलापूर) या आरोपींना अटक करण्यात आली असून,फरार आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.या कारवाईत एकुण १० लाख ८२ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.हि कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक सोलापूर व पंढरपूर विभाग सोलापूर या कार्यालयाने केली असून,या कारवाईमध्ये निरीक्षक पवन मुळे, दु.निरीक्षक एस.ए.पाटील,मनिषा मिसाळ, जी.एस.उंडे,एम.एम.शेख,पी.बी.देशमुख,सहा.दु.नि. गजानन होळकर जवान पी.एस.सावंत,के.एस.लुंगसे, अण्णा कर्चे.सी.एस.व्हनगुंटी यांनी सहभाग नोदविला. पुढील तपास पवन मुळे पाटील हे करत आहेत.