उपमुख्यमंत्री अजित पवारांवरकारवाईची मागणी ; पंढरपूरात सोशल डिस्टन्सींगचा फज्जा

भाजपाने केली कारवाईची मागणी

  सोलापूर : राज्याचे उपमूख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कोरोना प्रतिबंधीत नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई करण्यात यावी आशी मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे.
  पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूकीच्या अनुषंगाने उपमूख्यमंत्री अजित पवार हे पंढरपूर दौऱ्यावर होते. कार्यकर्त्य।च्या मेळाव्यात त्यांनी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिलेल्या कोरोना प्रतिबंधीत आदेशाचे उल्लघंन केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

   

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर विधानसभा दौऱ्यात जनतेच्या मनातील उमेदवारालाचं राकाँचे तिकीट मिळेल असे वक्तव्य करुन राजकीय फड गाजविला आहे. स्व.आ. भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मंगळवेढा पोट निवडणूक आयोगा मार्फत घेण्यात येत आहे. महाविकास आघाडीतील कोणत्या उमेदवाराला तिकीट मिळेल याची चर्चा दिवसभर रंगली होती. शिवसेनेकडून जि.प. सदस्या शैला गोडसे यांनी पक्षाकडे तिकीटांची मागणी केली आहे. मागील विधानसभेत त्यांचं तिकीट डावल्याने त्या नाराज होत्या. पोटनिवङणूकीत स्थानिक शिवसेना पदाधिकारी यांनी शैला गोडसे यांना उमेदवारी देण्याची आग्रही मागणी लावून धरली आहे.

  सोलापूर जिल्हयात कोरोना रूग्णांची दिवसेंदिवस भर पङत आहे. जिल्हा प्रशासनाने संसर्ग रोखण्यासाठी कठोर पाऊले उचलेली आहेत. मंगलकार्यालयधारक ,दुकानदार , फळविक्रेते, सामन्यजण विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते तर नियम तयार करणाऱ्या राज्यकर्त्य।वर कारवाई का करण्यात आली नाही. ५० पेक्षा अधिक व्यक्ती प्रचारसभेला उपस्थित होते. जिल्हा प्रशासन त्यांच्यावर मेहेरबान का ? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

  पोलिस जिल्हाधिकारी यांच्या आदेशाच्या प्रतिक्षेत

  पंढरपूरातील उपमूख्यमंत्री अजित पवार यांनी बोलविलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात कोरोना सोशल डिस्टन्सींग नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड असताना ग्रामीण पोलिस दल कारवाईसाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहे.