पत्नीशी भांडण झाल्यानंतर पेटवलं स्वत:चं घर; शेजाऱ्यांची पोलिसांत धाव

सोमवारी शामसुंदर भंडारी सायंकाळी घरी आला. त्यानंतर तो घरातून निघून गेला, थोड्याच वेळेत घरातून धूर येऊ लागले. बघता बघता आग मोठ्या प्रमाणात पेटली. घरातील गॅसच्या टाकीचा स्फोट झाल्याने आग भडकल्याचे स्थानिक नागरिकांनी माहिती दिली.

    सोलापूर : शहरातील पूर्व भागातील, नक्का वस्ती येथील राहत्या घरात पती पत्नीत वाद झाल्यानंतर रागाच्या भरात पतीने  स्वत:च्या घराला पतीने आग लावली. (House On Fire In Solapur)  सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. या आगीत शेजारच्या घरांना देखील आगीची झळ बसली आहे. आगीत घरातील फ्रीज, कपाट व प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले.

    शामसुंदर अंबाजी भंडारी याचे रविवारी पत्नीसोबत भांडण झाले. यावेळी त्याने पत्नीला मारहाण करून घरातून हाकलून दिले. तसेच रागाच्या भरात घरातील टीव्ही फोडून इतर साहित्यांचे नुकसान केले. पत्नी मुलासह घरातून गेल्यानंतर त्याने शेजाऱ्यांना स्वतःचे घर पेटवणार असल्याची धमकी दिली होती.

    सोमवारी शामसुंदर भंडारी सायंकाळी घरी आला. त्यानंतर तो घरातून निघून गेला, थोड्याच वेळेत घरातून धूर येऊ लागले. बघता बघता आग मोठ्या प्रमाणात पेटली. घरातील गॅसच्या टाकीचा स्फोट झाल्याने आग भडकल्याचे स्थानिक नागरिकांनी माहिती दिली. तसेच पतीपत्नीचे दोन दिवसांपासून भांडण होत होते. शामसुंदर भंडारी याने पत्नीला मारहाण करून माहेरी हाकलून दिले होते. ही आग शामसुंदर यानेच लावली आहे असा आरोप शेजारच्या लोकांनी केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनाम केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल करण्यात आला आहे.