जिल्हा परिषद सदस्यांना २५०कोटींचा हिशोब समजेना सर्व साधारण सभा होणार?

ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण १२ कोटी ५ लाख ५५ हजार निधी देण्यात आला आहे. यातील ३९ लाख पाच हजार खर्च बांधकाम २ विभागाने केला आहे. इतर जिल्हा रस्ता विकास मजबुती करण करिता ८ कोटी ५३ लाख निधी मंजूर असून २३ लाख ५० हजार खर्च करण्यात आला आहे.

  सोलापूर: जिल्हा परिषद सदस्यांना २५० कोटींचा हिशोब समजून येत नसल्याने गोंधळ उडाला आहे. अर्थ समिती मध्ये वारंवार विभाग प्रमूखांकडून खर्चाचा हिशोब मागितला जातो माञ हिशोब मिळत नसल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.प्रशासकीय मान्यता विना २५० कोटी अखर्चित राहिला असल्याचे अर्थ विभागाचे म्हणणे आहे. निधी खर्ची पाडण्यासाठी सर्व साधारण सभा घेण्यात यावी आशी मागणी सदस्य आनंद तानवडे यांनी केली आहे. जिल्हा नियोजनातील निधी वाटपा वरून पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि जि.प.अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांच्यात जुंपली आहे. ६० टक्के निधी हा जि.प.सदस्याना देण्यात यावा तर ४०टक्के निधी आमदारांना देण्यात यावा आशी मागणी अध्यक्षांकडून करण्यात आली मात्र ही मागणी पालकमंत्री भरणे यांनी फेटाळून लावली आहे.

  दत्तात्रय भरणे

  जिल्हा वार्षिक नियोजन योजनेतून मार्च २०२२ पर्यंत२५० कोटी निधी खर्च करण्यास प्राप्त परवानगी देण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षातील लघु पाट बंधारेचा ३ कोटीचा निधी शिल्लक आहे. ग्रामपंचायत विभागातून देण्यात येणाऱ्या तीर्थक्षेत्र विकास प्राप्त निधी ८ कोटी ५७ लाख ८८ हजार यापैकी एक रुपयाचा ही निधी खर्च करण्यात आला नाही. प्रशासकीय मान्यता देण्याचे कामकाज सुरू असल्यामुळे निधी खर्च झाला नसल्याचे ग्रामपंचायत विभागाकडून सांगण्यात येते. जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्ती करिता ६ कोटी ३० लाख निधी देण्यात आला आहे, यापैकी १७ लाख ३३ हजार इतका निधी खर्च करण्यात आला आहे. शाळेच्या नवीन बांधकामासाठी १४ कोटी १३ लाखांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे, मात्र एक रुपयाचा ही खर्च प्राथमिक शिक्षण विभागाने केला नाही. मागील सर्वसाधारण सभेत शाळा दुरुस्ती आणि नवीन बांधकामा संदर्भातील निधी खर्च करण्याची ओरड सदस्यांनी केली होती.

  जि.प.अध्यक्ष अनिरुध्द कांबळे

  ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण १२ कोटी ५ लाख ५५ हजार निधी देण्यात आला आहे. यातील ३९ लाख पाच हजार खर्च बांधकाम २ विभागाने केला आहे. इतर जिल्हा रस्ता विकास मजबुती करण करिता ८ कोटी ५३ लाख निधी मंजूर असून २३ लाख ५० हजार खर्च करण्यात आला आहे. अंगणवाडी इमारत बांधकामासाठी ११ कोटी ८० लाख निधी मंजूर असून हा निधी खर्च करण्यात आला नाही. कोवीड प्रादुर्भाव रोखण्यासाठी १ कोटी ३९ लाख ५५ हजार इतका निधी देण्यात आला होता यापैकी ८ लाख ५१ हजारांचा निधी खर्च करण्यात आला आहे.

  प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामासाठी ४कोटी ७५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. प्रशासकीय मान्यता विना निधी अखर्चित राहिला आहे तरी यातील उपकेंद्र दुरुस्ती आणि देखभाल यासाठी १ कोटी पैकी खर्च शून्य आहे. प्राथमिक उपकेंद्राच्या बांधकामांसाठी ६ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर आहे. यापैकी खर्च शून्य आहे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग १ ग्रामीण रस्ते विकास मजबुती साठी सुमारे २१ कोटींचा निधी देण्यात आला आहे केवळ २८ लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे. कृषी विभागातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत विहीर करण्यासाठी ६ कोटींचा निधी देण्यात आला आहे. खर्च मात्र शून्य आहे.

  विद्यार्थ्यांची गुणवत्ता शिष्यवृत्ती अद्याप देण्यात आले नाही एक कोटी निधी मंजूर असून विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती देण्यात आली नाही दलित विकास सुधार योजनेत ५४ कोटी ४४ लाख इतका निधी मंजूर आहे मात्र प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या नसल्यामुळे विकास निधी खर्च करण्यात आला नाही.