प्राण्यांच्या हाडा मांसापासून बनवलं जात होतं तेल, तूप; सोलापूरात दोघांना अटक

तुळजापूर रोडवरील कचरा डेपो शेजारी इम्रान कुरेशी यांचा ट्रिपल ट्रेडिंग कंपनी व अलिम कुरेशी याचा वसी एन्टरप्रायजेस नावाचे दोन फर्म पत्र्याच्या शेडमध्ये सुरू होते. जनावरांचे मांस, हाड व हाडांची भुकटी बनवून बेकायदेशीररीत्या डालडा बनविण्याचा कारखाना सुरू केला होता. पोलीस पथक जेव्हा या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना तेथे मोठमोठ्या सात कढई दिसून आल्या. त्यात एकामध्ये विविध जनावरांच्या आतड्या भरल्या होत्या. त्याला पेटवण्यासाठी मोठा खाली बंबही होता. ती कढई जवळपास दहा बाय दहा होती. दुसऱ्या कढईमध्ये तूपजन्य पदार्थ दिसून येत होता. तर शेजारीच तुपाने भरलेले डबे आणि जवळपास दहापेक्षा जास्त बॅरेल होते.

    जनावरांची कत्तल केल्यानंतर फेकून देण्यात येणाऱ्या अवयवांपासून बनावट तेल आणि वनस्पती तूप बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी कारवाई केलीय. सोलापूर-तुळजापूर महामार्गावर शिवारात असलेल्या कारखान्यावर धाड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या परिसरात दुर्गंधी पसरल्याची तक्रार काही नागरिकांनी पोलिस आयुक्तांकडे केली होती. पोलिसांनी विशेष पथक पाठवून या ठिकाणी चौकशी केली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

    तुळजापूर रोडवरील कचरा डेपो शेजारी इम्रान कुरेशी यांचा ट्रिपल ट्रेडिंग कंपनी व अलिम कुरेशी याचा वसी एन्टरप्रायजेस नावाचे दोन फर्म पत्र्याच्या शेडमध्ये सुरू होते. जनावरांचे मांस, हाड व हाडांची भुकटी बनवून बेकायदेशीररीत्या डालडा बनविण्याचा कारखाना सुरू केला होता.

    पोलीस पथक जेव्हा या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना तेथे मोठमोठ्या सात कढई दिसून आल्या. त्यात एकामध्ये विविध जनावरांच्या आतड्या भरल्या होत्या. त्याला पेटवण्यासाठी मोठा खाली बंबही होता. ती कढई जवळपास दहा बाय दहा होती. दुसऱ्या कढईमध्ये तूपजन्य पदार्थ दिसून येत होता. तर शेजारीच तुपाने भरलेले डबे आणि जवळपास दहापेक्षा जास्त बॅरेल होते.

    या कारखान्यावर सर्व मशीन या ॲटोमॅटिक होत्या. हा कारखाना चालवण्यासाठी जेमतेम फक्त तीन ते चार कामगारांची गरज असावी. यातूनच तूपजन्य पदार्थ बनवले जात होते. पण बनवले जाणारे पदार्थ सोलापुरातही विकायला जात होते का याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच ज्या शेतावर हा कारखाना उभारण्यात आला आहे. त्या शेतमालकाची चौकशीही करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

    प्राथमिक तपासामध्ये कारखान्यासाठी वापरली जाणारी वीज देखील चोरीची असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे. महानगरपालिकेची कोणतीही परवानगी देखील या कारखाना चालकांनी घेतलेली नाही. अतिशय घाणीत तयार केला जाणारा पदार्थाची विक्री नेमकी कुठे केली जात होती हा मात्र मोठा प्रश्न आहे.