मोहोळ शहरातील आठवडे बाजार परिसरातील मोकाट जनावरांचा हैदोस ; बंदोबस्त करण्याची मागणी

मोकाट जनावरांमुळे मोठया प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरत आहे. शिवाय व्यापारी बंधूना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्याकरिता मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा वेळीच बंदोबस्त करावा या मागणी करिता रमेश बारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती क्रांती परिषद मोहोळ शहर यांच्या वतीने परिसरातील व्यापारी बंधूंना घेऊन मोहोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ योगेश डोके यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

    मोहोळ:मोहोळ शहरातील आठवडे बाजार व गवत्या मारूती चौक परिसरामध्ये मोकाट जनावरांनी हैदोस घातला आहे. त्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

    सदर मोकाट जनावरांमुळे मोठया प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरत आहे. शिवाय व्यापारी बंधूना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्याकरिता मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा वेळीच बंदोबस्त करावा या मागणी करिता रमेश बारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती क्रांती परिषद मोहोळ शहर यांच्या वतीने परिसरातील व्यापारी बंधूंना घेऊन मोहोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ योगेश डोके यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

    सदर मागणीच्या अनुषंगाने संबंधित प्रश्न त्वरित मार्गी लावण्याकरता संबंधित क्षेत्राच्या अधिकाऱ्याशी तसेच गोशाळेशी संपर्क करून लवकरात लवकर मोकाट फिरणारी जनावरे ही गोशाळेला देण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेश प्रवक्ते शिलवंत क्षिरसागर, शाखाध्यक्ष बाळासाहेब माळी, यांच्यासोबत व्यापारी प्रसाद वस्त्रे, औदुंबर बारसकर, बबलू सादीगले, शबीर शेख, भारत तेली, गुरुप्रसाद वस्त्रे, रियाज शेख आदी जण उपस्थित होते.