बार्शी मालवंडी रस्त्याची दुरवस्था; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

    बार्शी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बार्शी मोहोळ रस्त्यावरील कासारवाडी, बळेवाडी, कोरफळे, मालवंडी, गुळपोळी या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी करत येथील गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

    या रस्त्यावर खूप खड्डे पडले असून, अनेक अपघातही झाले आहेत. अपघातामुळे मोठा अनर्थ टाळण्यासाठी लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. याबाबत मालवंडी, गुळपोळी, तुर्क पिंपरी, अंजनगाव येथील सरपंचासह ग्रामस्थांनी सह्यांचे निवेदन तहसीलदार सुनील शेरखाने यांना बुधवारी दिले.

    यावेळी मालवंडीचे सरपंच भैय्या होनमाने, महेश होनमाने, तुर्क पिंपरी चे डॉ. लहू घुले, फुलचंद चतुर, संदीप लोंढे, गुळपोळीचे अमोल नरखेडे, निरंजन चिकणे, अंजनगावचे सरपंच अलविंक आदी उपस्थित होते.