भगीरथ भालके हेच आमचे नेते, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घातलं साकडं

पंढरपूर विधानसभा मतदारसंघ (Pandharpur Assembly constituency) ओपन झाल्यानंतर पंढरपूर येथील विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भारत नाना भालके (Bharat Nana Bhalke) यांनी मंगळवेढा (Magalwedha) तालुक्यात २००७ पासून जनसंपर्क वाढवत शेतकऱ्यांच्या (Farmers) व सर्वमान्यजनाच्या हितासाठी शेतकऱ्याचा मुलगा विधानसभेत गेला पाहिजे ह्या दृष्टीने तयारी सुरू केली.

मंगळवेढा : मंगळवेढा-पंढरपूरचे ( Mangalwedha-Pandharpur ) विद्यमान आमदार भारत भालके (MLA Bharat Bhalke) यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे त्यांच्या हजारो समर्थकांनी सरकोली येथे जाऊन कै. भालके यांच्या प्रतिमेसमोर त्यांचे पुत्र व विठ्ठलचे संचालक भगीरथ भालके ( Bhagirath Bhalke ) हेच आमचे नेते असून त्यांनी आमचे नेतृत्व व कुटुंबकर्ता म्हणून स्वीकारण्याची गळ घातली आहे. भरलेल्या अश्रूंनी व गहीवरलेल्या अवस्थेत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत दिवंगत आमदार भालके यांच्या आठवणींना उजाळा दिला.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघ ओपन झाल्यानंतर पंढरपूर येथील विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भारत नाना भालके यांनी मंगळवेढा तालुक्यात २००७ पासून जनसंपर्क वाढवत शेतकऱ्यांच्या व सर्वमान्यजनाच्या हितासाठी शेतकऱ्याचा मुलगा विधानसभेत गेला पाहिजे ह्या दृष्टीने तयारी सुरू केली. भारदस्त वक्तृत्व, रांगडा स्वभाव आणि गोरगरिबांच्या हाकेला धावून जाण्याची वृत्ती यामुळे येथील जनतेचे ते ताईत बनले होते. कोणत्याही पक्षात असले तरी खा. शरदचंद्र पवार यांना दैवत मानत विधानसभा निवडणुकीत उतरले.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत भारत भालके विधानसभेत पोहचले. तालुक्यातील अनेक प्रश्नांसाठी विधानसभेत आवाज उठवला. त्यांच्या सातत्याने केलेल्या प्रयत्नामुळे अशक्य असणाऱ्या ५३० कोटींच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी मिळाली. म्हैसाळ योजनेची रखडलेली कामे मार्गी लावली, शिरणानंदगी तलावात पाणी सोडले, ४० गावांची भोसे प्रादेशिक योजना, प्रांत कार्यालय, विविध कार्यालये मंजुरी व उभारणीसाठी निधी, रस्ते, पूल, बंधारे, राज्यातील सर्वाधिक तीर्थक्षेत्र विकास निधी, बसवेश्वर स्मारक, चोखामेळा स्मारक उभारणी निधी साठी पाठपुरावा, पीकविमा, यासह अनेक विकासकामे त्यांनी मार्गी लावली.

कै. आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र कै. भालके यांचे खा. पवार साहेबांवरील प्रेम पाहता त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आमची असून कै. भारतानानाचे पुत्र भगीरथ यांना आम्ही योग्य वेळी न्याय देऊ असे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सूचित केले असल्याने त्यांच्याकडे येथील नेतृत्व दिले जाणार आहे.