Bhaknuk in Siddheshwar Yatra of Solapur

सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या यात्रेत 'भाकणूक' प्रथेला मोठं महत्व आहे. येत्या वर्षात हवामान आणि वातावरनाची दिशा कशी असणार याचं भविष्य यातून मांडलं जातं. यंदाच्या भाकणुकीमध्ये समाधानकारक पाऊस असणार आहे. मात्र, भीतीचे वातावरण कायम राहिलं तसेच राजकीय क्षेत्रात स्तिरता दिसून येईल अशी 'भाकणूक' वर्तवण्यात आली आहे(Bhaknuk in Siddheshwar Yatra of Solapur).

  सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या यात्रेत ‘भाकणूक’ प्रथेला मोठं महत्व आहे. येत्या वर्षात हवामान आणि वातावरनाची दिशा कशी असणार याचं भविष्य यातून मांडलं जातं. यंदाच्या भाकणुकीमध्ये समाधानकारक पाऊस असणार आहे. मात्र, भीतीचे वातावरण कायम राहिलं तसेच राजकीय क्षेत्रात स्तिरता दिसून येईल अशी ‘भाकणूक’ वर्तवण्यात आली आहे(Bhaknuk in Siddheshwar Yatra of Solapur).

  ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या यात्रेच्या तिसऱ्या दिवशी होमप्रदीपन विधी नंतर दिवसभर उपाशी ठेवलेल्या मानकरी देशमुख यांच्या शेतातील वासराला भाकणूकस्थळी आणले जाते. याठिकाणी त्या वासराची विधिवत पूजा करण्याते येते.

  मैदानावर अंथरलेल्या घोंगडीवर खारीक, विविध प्रकारचे धान्य, गूळ, खोबरे, बोर, गाजर, पाने, ऊस आदी खाद्यवस्तू ठेवण्यात येतात. यंदा या वासराने ऊस, गजाराला स्पर्श केल्याने लाल आणि पांढऱ्या वस्तू महागणार अशी भाकणूक करण्यात आली.

  दरम्यान, या वासरासमोर पेटता टेंभा धरण्यात आला तेंव्हा वासरू बिथरले. यावरून येत्या काळात घाबराटीचे वातावरण राहणार असल्याच सांगण्यात आले. तर शेवटी वासराने मूत्र विसर्जन केल्यामुळे यंदा पाऊस समाधानकारक असल्याचे भाकणुकीत नमूद करण्यात आले.

  हे सुद्धा वाचा
  • 2022