चेतन गायकवाड
चेतन गायकवाड

पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी सांगितले की, उपमहापौर राजेश काळे यांच्यावर सात गुन्हे दाखल होते. त्यांना सोलापूर उस्मानाबाद इंदापूर येथून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले तर सेटलमेंट भागातील रहिवासी चेतन नागेश गायकवाड यांनाही दोन वर्षासाठी सोलापूर उस्मानाबाद इंदापूर येथून तडीपार करण्यात आला आहे त्यांच्यावर खून खुनाचे प्रयत्न असे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत.

    सोलापूर : सोलापूर महानगर पालिका भाजपा उपमहापौर राजेश काळे यांच्यासह नगरसेवक सुपूत्रास पोलिस प्रशासनाने तडीपार केल्याने खळबळ उडाली आहे. वादग्रस्त उपमहापौर राजेश काळे यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करीत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होता या गुन्ह्यांमध्ये ते फरार होते नंतर त्यांना अटक झाली भारतीय जनता पार्टीने त्यांना पक्षातून निलंबित केले होते.

    उपमहापौर राजेश काळे

    पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी सांगितले की, उपमहापौर राजेश काळे यांच्यावर सात गुन्हे दाखल होते. त्यांना सोलापूर उस्मानाबाद इंदापूर येथून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले तर सेटलमेंट भागातील रहिवासी चेतन नागेश गायकवाड यांनाही दोन वर्षासाठी सोलापूर उस्मानाबाद इंदापूर येथून तडीपार करण्यात आला आहे त्यांच्यावर खून खुनाचे प्रयत्न असे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत.

    चेतन गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नागेश गायकवाड यांचे पुत्र आहेत. तर उपमहापौर राजेश काळे भारतीय जनता पार्टीचे निलंबित कार्यकर्ते आहेत.मागच्या काही दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील आणि राजेश काळे यांच्यात चांगलीच जुंपली होती या प्रकरणामुळे भाजपची प्रतिमा आणखीच मलीन झाल्याचं दिसून आलं.

    महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमहापौर राजेश काळे यांना पोलिस प्रशासनाने तडीपार केल्याने भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का समजला जातो आहे राजेश काळे हे माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.