भा.ज.पा.चे उपमहापौर राजेश काळे यांना रात्रीतून अटक

विजापूर नाका पोलीस ठाण्यात उपमहापौर राजेश काळे यांच्यावर नवीन गुन्हा दाखल झाला आहे. वीज वितरण कंपनीने वीज कनेक्शन तोडल्यामुळे उपमहापौर काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोटणीस नगर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे.याप्रकरणी उपमहापौर काळेसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.विजापूर नाका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजेश काळे सह इतर दोघांना अटक केली आहे.

    सोलापूर : वेगवेगळ्या कारणांमुळे अडचणीत येणारे सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना विजापूर नाका पोलिसांनी रात्रीतून अटक केली आहे. राजेश काळे ,यांच्यासह अनुप बेंजरपे,महेश म्हेत्रे अटकेत आहेत.

    उपायुक्त धनराज पांडे यांना शिवीगाळ करून खंडणी मागितल्याप्रकरणी उपमहापौर राजेश काळे यांना यापूर्वी जानेवारी महिन्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर राजेश काळे यांची १३जानेवारी २०२१ रोजी भा.ज.पा.तून हकालपट्टी करण्यात आली आहे. भा.ज.पा.चे शहर सरचिटणीस शशी थोरात यांनी याबाबत घोषणा केली होती.

    गुरुवारी रात्री विजापूर नाका पोलीस ठाण्यात उपमहापौर राजेश काळे यांच्यावर नवीन गुन्हा दाखल झाला आहे. वीज वितरण कंपनीने वीज कनेक्शन तोडल्यामुळे उपमहापौर काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोटणीस नगर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे.याप्रकरणी उपमहापौर काळेसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.विजापूर नाका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजेश काळे सह इतर दोघांना अटक केली आहे.