शाळेतून अल्पवयीन मुलगी गायब; चित्रा वाघ यांनी सरकारसह पोलिस प्रशासनाला धरलं धारेवर

बार्शी येथील शाळेतून दहावीत शिक्षण घेत असलेली मुलगी मागील अनेक दिवसांपासून बेपत्ता असून, बार्शी शहर पोलिसात याबाबत पालकांनी तक्रार दाखल केली आहे.

    बार्शी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बार्शी येथील शाळेतून दहावीत शिक्षण घेत असलेली मुलगी मागील अनेक दिवसांपासून बेपत्ता असून, बार्शी शहर पोलिसात याबाबत पालकांनी तक्रार दाखल केली आहे. याबाबत शहर व परिसरातील पालकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विटरवरून पोलीस प्रशासन आणि सरकारला धारेवर धरलं आहे.

    महाराष्ट्रामध्ये सध्या तरुण मुलींचं अचानक गायब होण्याचं प्रमाण वाढलं आहे. यामध्ये आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शीची मुलगी मागच्या 20 दिवसांपासून बेपत्ता आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली आहे.

    पोटात दुखतंय सांगून घरी

    मुलीने शाळेतील तिच्या मैत्रिणींना माझ्या पोटात दुखत असल्याने घरी जाते म्हणून शाळेतून २२ डिसेंबर २०२१ रोजी निघून गेली आहे. परंतु, शाळा सुटूनही ती घरी न आल्याने सगळीकडे शोधाशोध केली. परंतु, ती कुठेही मिळून आली नाही, म्हणून याबाबत पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याबाबत गणेश भोकरे याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.