सीईओ स्वामींची ॲक्शन : शिक्षणविभागातील ५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या , ठाणेदार कर्मचाऱ्यांची मार्चमध्ये उचलबांगडी

कर्मचाऱ्यांच्या वाढत्या तक्रारीमूळे सीईओ स्वामी यांनी वादग्रस्त कर्मचाऱ्यांची बदली करण्याचे विभाग प्रमूखांना पत्राद्वारे सुचीत केले होते. बदल्या संदर्भातील विभागप्रमूखांची उदासीनता दिसल्यामूळे सीईओ स्वामी यांनी खडेबोल सुनावले होते.

    सोलापूर : जिल्हा परिषद सीईओ दिलीप स्वामी ॲक्शनमोडवर आले आहेत. वर्षानवर्ष एकाचं टेबलावर कार्यासन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यास सुरूवात झाली आहे.गुरुवारी प्राथमिक शिक्षणविभागातील ५ कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

    दैनिक ‘नवराष्ट्र’नी ठाणेदार कर्मचाऱ्यांची विशेष वृत्तमालिका प्रकाशीत केली होती. या वृत्तमालिकेची दखल सीईओ स्वामी यांनी घेऊन कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.मुख्यालयात अनेक वर्षापासून ठाण मांडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यासंदर्भात अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी पत्राद्वारे सुचीत केले होते. ठाणेदार कर्मचाऱ्यांची मार्च एप्रिल महीन्यात मुख्यालया बाहेर उचलबांगडी करण्यात येणार आहे.

    गेल्या अनेक वर्षापासून मुख्यालयात ठाणमांडून असणाऱ्या वादग्रस्त कर्मचाऱ्यांची मार्च एप्रिल मध्ये पंचायात समितीस्तरावर बदली करणार आहे. याच दरम्यान विविध प्रकरणातील प्रशासकीय चौकशीत दोषी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार आहे.

    -दिलीप स्वामी सीईओ जि.प.

    कर्मचाऱ्यांच्या वाढत्या तक्रारीमूळे सीईओ स्वामी यांनी वादग्रस्त कर्मचाऱ्यांची बदली करण्याचे विभाग प्रमूखांना पत्राद्वारे सुचीत केले होते. बदल्या संदर्भातील विभागप्रमूखांची उदासीनता दिसल्यामूळे सीईओ स्वामी यांनी खडेबोल सुनावले होते. आरोग्य विभागाच्या पाठोपाठ प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक जी.एस.मस्के (ग्रामपंचायात) वरिष्ठ सहाय्यक एफ.एन.शेख (बांधकाम१) कनिष्ठ सहाय्यक डी.व्ही.जगताप (बांधकाम २) कनिष्ठ सहाय्यक एन.एस. कोमारी (ग्रामीण प्रकल्प संचालक)कनिष्ठ सहाय्यक डि.पी.समदुरल (ग्रामीण पाणी पुरवठा ) असे बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आणि विभाग आहेत.