कॉम्रेड अण्णाभाऊ हे श्रमिकांचा विचार जगले : प्रा. तानाजी ठोंबरे

कॉम्रेड अण्णाभाऊ हे श्रमिकांचा विचार जगले, श्रमिकांचा विचार ज्या रशियामध्ये क्रांतीने आला तो रशिया देश पाहण्यासाठी अण्णाभाऊ तिथपर्यंत जाऊन पोहोचले. रशियामध्ये अण्णाभाऊंनी जे पाहिले, जे अनुभवले, ते या पुस्तिकेमध्ये नमूद केले आहे, असे यावेळी तानाजी ठोंबरे म्हणाले.

    बार्शी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कॉम्रेड डॉ. प्रविण मस्तुद लिखित ‘अण्णाभाऊंचा रशियाचा प्रवास’ या पुस्तिकेचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांच्या हस्ते पक्षाच्या बैठकीमध्ये प्रकाशित करण्यात आले.

    यावेळी दलित पँथरचे शहिद भागवत जाधव व रमेश देवरुखकर या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कॉम्रेड अण्णाभाऊ हे श्रमिकांचा विचार जगले, श्रमिकांचा विचार ज्या रशियामध्ये क्रांतीने आला तो रशिया देश पाहण्यासाठी अण्णाभाऊ तिथपर्यंत जाऊन पोहोचले. रशियामध्ये अण्णाभाऊंनी जे पाहिले, जे अनुभवले, ते या पुस्तिकेमध्ये नमूद केले आहे, असे यावेळी तानाजी ठोंबरे म्हणाले.

    यावेळी कॉम्रेड ए. बी. कुलकर्णी, कॉम्रेड लहूआगलावे, कॉम्रेड भारत भोसले, कॉम्रेड अनिरुद्ध नखाते आदी कॉम्रेड उपस्थित होते.