मोदी सरकारवर विरोधात काँग्रेस आक्रमक : आ.प्रणिती शिंदे यांचा एल्गार ; काँग्रेसचे कृषी कायदे आणि इंधन दर वाढी विरोधात उपोषण

    सोलापूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकार विरोधात काँग्रेस आक्रमक आहे. जो पर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आणि इंधन दरवाढ कमी होत नाही तो पर्यंत आमचा एल्गार असे आ.प्रणिती शिंदे यांनी पुकारला काँग्रेस भवना समोर शेकडो कार्यकर्त्य।समवेत उपोषण करित आहेत.

    काँग्रेसच्या वतीने जिल्हयात सर्वत्र भारतबंदच्या पार्शवभूमीवर आंदोलन करण्यात येत आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त आंदोलना स्थळी तैनात करण्यात आला आहे.मोदी सरकारने पारित केलेल्या शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करण्यासाठी, कामगार विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणी साठि, तसेच पेट्रोल, डिझेल, गैस सिलेंडर दरवाढ रद्द करण्याच्या मागणी साठि सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आले आहे.