सांगोल्याच्या तुरुंगात कोरोनाचे थैमान, ५४ पैकी २४ कैद्यांना कोरोनाची लागण

सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तुरुंगात कोरोनानं थैमान घालायला सुरुवात केलीय. सांगोला तुरुंगात सध्या ५४ कैदी आहेत. त्यापैकी २४ जणांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालंय. या कैद्यांना वेगळं काढण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेत. इतर कैद्यांचीदेखील चाचणी करण्यात आली असून त्यांना एकमेकांपासून वेगळं ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनानं दिलीय. 

    कोरोनाने महाराष्ट्रात धुमाकूळ घालायला सुरुवात केली असून राज्यातील बहुतांश शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं चित्र निर्माण झालंय. काही शहरांत अंशतः लॉकडाऊन असून रुग्णांची संख्या वाढली नाही, तर लॉकडाऊन करण्याचा इशारा सरकारच्या वतीनं देण्यात आलाय. कोरोनाचा हा प्रकोप आता तुरुंगापर्यंतही पोहोचलाय.

    सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तुरुंगात कोरोनानं थैमान घालायला सुरुवात केलीय. सांगोला तुरुंगात सध्या ५४ कैदी आहेत. त्यापैकी २४ जणांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालंय. या कैद्यांना वेगळं काढण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेत. इतर कैद्यांचीदेखील चाचणी करण्यात आली असून त्यांना एकमेकांपासून वेगळं ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनानं दिलीय.

    तुरुंगात कोरोना कसा पोहोचला, याची चर्चा आता सुरु झालीय. मात्र कैद्यांना आता एकमेकांपासून सोशल डिस्टन्सिंग ठेऊन बंद करण्यात आलंय. तुरुंगातील इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये, याची खबरदारी घेतली जात आहे. कैद्यांना भेटण्यावर बंधने लादण्यात आली असून काही दिवसांनंतर पुन्हा एकदा कैद्यांची चाचणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.