बार्शीत दहा लाख लिटर्स क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण

सुभाष नगर भागातील ब्रिटिशकालीन ३० लक्ष लिटर्स क्षमतेच्या हौदाजवळ पूर्वी अस्तित्वात असलेल्या पंप गृहामध्ये ४० अश्वशक्तीचे दोन पंप पॅनल व इतर साहित्य बसवून पंप गृह ते या उंच टाकीदरम्यान टाकण्यात आलेल्या पाईपलाईनद्वारे या विस्तारित भागातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जाणार आहे.

    बार्शी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बार्शी नगरपरिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र सुजल निर्मल अभियान अंतर्गत, बार्शी शहर पाणीपुरवठा योजनेतील एक भाग असलेल्या, सुभाष नगर भागातील ताडसौंदणे रोडवरील बी.आय.टी. इंजिनिअरींग कॉलेजच्या पाठीमागील बाजूस नव्याने उभारण्यात आलेल्या १० लक्ष लिटर्स क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांच्या हस्ते करण्यात आले.

    नव्याने उभारण्यात आलेल्या या पाण्याच्या टाकीमधून बार्शी शहरातील विस्तारित भागातील वाणी प्लॉट, कथले प्लॉट, कॅन्सर हॉस्पिटल परिसर, पंकज नगर भागातील रहिवाशांना पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या पाण्याच्या टाकीमुळे येथील रहिवाशांना उच्च दाबाने, चांगल्याप्रकारे पाणी पुरवठा होण्यासाठी मदत होणार आहे.

    सुभाष नगर भागातील ब्रिटिशकालीन ३० लक्ष लिटर्स क्षमतेच्या हौदाजवळ पूर्वी अस्तित्वात असलेल्या पंप गृहामध्ये ४० अश्वशक्तीचे दोन पंप पॅनल व इतर साहित्य बसवून पंप गृह ते या उंच टाकीदरम्यान टाकण्यात आलेल्या पाईपलाईनद्वारे या विस्तारित भागातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जाणार आहे.

    यावेळी नगराध्यक्ष ॲड. आसिफ तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, नगरसेवक विलास रेनके, प्रशांत कथले, बापूसाहेब वाणी, बाळासाहेब लांडे, सुभाष लोढा, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, पक्षनेते विजय राऊत, पाणी पुरवठा सभापती संतोष बारंगुळे, जलदाय अभियंता अजय होनखांबे, नगरसेवक दीपक राऊत, कय्युम पटेल, आण्णासाहेब लोंढे, नागजी दुधाळ, अमोल चव्हाण, ॲड. महेश जगताप, विजय चव्हाण, काकासाहेब फुरडे, इमरान मुल्ला, संदेश काकडे, उपस्थित होते.