जि.प.सदस्यांचा अपेक्षाभंग : बजेटची सभा तहकूब, आचारसंहितेचा फटका

जि.प.सेसफंडावरून मोठे वादंग सभागृहात पाहण्यास मिळाले , सेसनिधी वाटपावरून सचिन कल्याणशेट्टी यांनी घेतलेली हारकत आणि शासनानी सेसनिधीला दिलेली स्थगितीमूळे गेल्या वर्षभरात चर्चेचा विषय ठरला होता.

    सोलापूर : जिल्हा परिषद सदस्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. २५ मार्च रोजी नियोजित करण्यात आलेली बजेटची सभा अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांनी तहकूब केली आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा आचारसंहीतेमूळे नियोजीत सभा तहकूब करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षापासून सदस्य बजेट सभेपासून वंचीत आहेत. ऐन बजेट सभे दरम्यान आचारसंहीता लागत असल्यामूळे सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आचार संहीता असली तरी सभा घेऊन विविध विषयांची चर्चा घेण्यात येणार असल्याची भूमिका अध्यक्ष अनिरूध्द कांबळे यांची होती. मात्र सभा घेतली तर आचार संहीतेचा भंग होऊ शकतो आशी माहीती सभागृह सचिवाने दिल्याने मंगळवारी बजेट सभा तहकूब करण्याचा निर्णय अध्यक्ष कांबळे यांनी घेतला.

    जि.प.सेसफंडावरून मोठे वादंग सभागृहात पाहण्यास मिळाले , सेसनिधी वाटपावरून सचिन कल्याणशेट्टी यांनी घेतलेली हारकत आणि शासनानी सेसनिधीला दिलेली स्थगितीमूळे गेल्या वर्षभरात चर्चेचा विषय ठरला होता. हा वाद सुरु असतानाचं कोरोना लॉकडाऊनचा फटका सेसफंडाला बसला, ५०% सेस निधी कपातीचे धोरण शासनाकडून जाहीर करण्यात आले. त्यामूळे सदस्यांची ओरड होत होती. ५०% कपातीचा निर्णय शासनानी माघार घ्यावी आशी मागणी बजेटच्या सभेत सदस्यांकडून करण्यात येणार होती. विविध समिती सभापतीनी वाढीव निधीची मागणी अध्यक्ष यांच्याकडे केली आहे.

    ३१ मार्च पर्यंत प्रशासकीय स्तरावर सीईओ दिलीप स्वामी बजेट जाहीर करणार आहेत. कोणत्या समितीला किती निधी मिळणार हे अजून तरी गुलदसत्यातचं आहे. निधीवरून अनेक तर्कविर्तक सदस्यांमधून लढविले जात आहे.