मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे सावित्रीज्योती पुरस्काराचे वितरण

अ. भा. महात्मा फुले समता परिषद मोहोळ तालुका यांच्यावतीने तालुकाध्यक्ष अमोल माळी यांच्या संकल्पनेतून ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त सावित्रीज्योती पुरस्काराचे नुकतेच मान्यवरांच्या हस्ते कुरूल ता. मोहोळ येथे वितरण करण्यात आले.

    मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : अ. भा. महात्मा फुले समता परिषद मोहोळ तालुका यांच्यावतीने तालुकाध्यक्ष अमोल माळी यांच्या संकल्पनेतून ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त सावित्रीज्योती पुरस्काराचे नुकतेच मान्यवरांच्या हस्ते कुरूल ता. मोहोळ येथे वितरण करण्यात आले.

    कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावर्षीचे पुरस्कारार्थी उपविभागीय पोलिस अधिकारी मंगळवेढा राजश्री पाटील यांना पोलीस विभागातील उत्कृष्ट पुरस्कार, कला विभागातील शाळा वेबसीरिज फेम अभिनेत्री अनुश्री माने, क्रीडा विभागातील बॉक्सिंग चॅम्पियन तेजस्विनी नामदे, सामाजिक कार्यातील लेक माहेरचा कट्टा नवी मुंबईच्या सारिका ढाणे, शैक्षणिक कार्यातील करकंब येथील शिक्षिका अनिता वेळापूरकर यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

    तसेच गेल्या वर्षीच्या पुरस्कार प्राप्त कला विभागातील एक गाव तेरा भानगडी वेबसिरीज फेम अभिनेत्री सायली वाघमारे, क्रीडा विभागातील निर्जला माळी, पोलीस विभागातील अनुसया बंडगर, सामाजिक कार्यातील लता बोराडे, शैक्षणिक विभागातील सुप्रिया क्षिरसागर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

    या कार्यक्रमासाठी महात्मा फुले समता परिषद महिला प्रदेशाध्यक्षा मंजिरी धाडगे, जिल्हाध्यक्ष आबासाहेब खारे, मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा अरुणा माळी, राष्ट्रवादीच्या नेत्या प्रणिती भालके, जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे, युवा नेते रमाकांत पाटील, बापू भंडारे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी भानवसे, सीमा एकतपुरे, सरपंच चंद्रकला पाटील, अविनाश बनसोडे, भैरवनाथ बुरांडे, लक्ष्मण माळी, युवा उद्योजक नागेश भंडारे, शिवाजी भानवसे, मंगळवेढा पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रेय नवत्रे आदीसह समता परिषदेचे पदाधिकारी कुरुल पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक माऊली जाधव, सूत्रसंचालन सिद्धेश्वर तोरकडे व आभार कार्यक्रमाचे आयोजक अमोल माळी यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समता परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.