बार्शी शहर व तालुक्यात शांततेत गणेश विसर्जन; शहरात चौदा हजार तर तालुक्यात तीन हजार गणेश मूर्ती

  बार्शी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बार्शी शहर व तालुक्यात रविवारी गणेश विसर्जन शांततेत पार पडले. शहर व तालुक्यात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शहरात १४,१३७, वैरागमध्ये १३७५, पांगरीत १२५० घरगुती गणपतींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले.

  शहरात सकाळी नगरपरिषदेसमोर नगरअध्यक्ष असिफ तांबोळी यांनी गणेशसंकलणास प्रारंभ केला. शहरात संकेश्वर उद्यान, एकविराई मंदिर, सुभाषनगर, लहुजी चौक, टिळक चौक, स्टँड चौक, पोस्ट चौक, रमाई चौक आदी दहा ठिकाणी संकलन केंद्र ठेवण्यात आले होते.

  यावेळी मुख्य अधिकारी अमिता दगडे पाटील यांच्यासह प्रशासन अधिकारी शिवाजी कांबळे, नगर अभियंता भारत विधाते, विद्युत अभियंता अविनाश शिंदे, मिळकत कर अधिकारी महादेव बोकेफोडे, आरोग्य सभापती संतोष बारंगुळे, आरोग्य विभाग प्रमुख शब्बीर वस्ताद यांच्यासह नगरपरिषदेचे अग्निशामक दलाचे कर्मचारी व आरोग्यसेवक उपस्थित होते.

  वैराग भागात वैराग सह रातंजन गौडगाव या भागातही गणेश विसर्जन शांतातेत करण्यात आले. हिंगणी तलाव व वैरगच्या दत्त नगरयेथील सार्वजानिक विहरित विसर्जन करण्यात आले.

  वैरागचे पोलीस निरीक्षक विनय बहिर, सहायक पोलिस निरीक्षक महारुद्र परजने,पो.ना. सचिन मुंढे,हवालदार सदानंद गवळी , उपनिरीक्षक राजेंद्र राठोड, पाडूले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पांगरी भागातही गणेश विसर्जन शांततेत पार पडले.
  पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते,पोलिस उपअधीक्षक अभिजित धारशिवकर, यांच्या मार्गदर्शनखाली बार्शी शहरचे पोलिस निरीक्षक रामदास शेळके, ग्रामीणचे पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, पांगरीचे सहायक पोलिस निरक्षक सुधीर तोरडमल यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

  तालुक्यातील उंबरगे, गुळपोळी, काटेगाव, फफालवाडी, शेळगाव (मा), भोइंजे, धामणगाव, तावली, वानेवडी, सौंदरे, खडकलगाव, मलेगांव, पांगरी या गावात एक गाव एक गणपती हा उपक्रम राबविण्यात आला. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारची मिरवणूक व सार्वजिक उत्सव साजरा न करता शहर व तालुक्यातील नागरिकांनी शांततेत विसर्जन केल्याने प्रशासनाने धन्यवाद दिले.