gopichand padalkar
gopichand padalkar

    सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हे देशाचे पंतप्रधान होतील का असा सवाल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना पत्रकारांनी केला. त्यावर उत्तर देताना पडळकर म्हणाले, रात गेली हिशोबात पोरगं नाही नशिबात अशी मिस्कील कोपरखळी मारली.

    मागील काही दिवसांपासून गोपीचंद पडळकर हे राज्यभर घोंगडी बैठका घेत आहेत. त्याच दौऱ्याच्या अनुषंगाने बुधवारी आमदार पडळकर हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. दरम्यान पार्क चौक येथील श्रमिक पत्रकार वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना आमदार पडळकर बोलत होते.

    शरद पवार हे भावी पंतप्रधान असून, मागील तीस वर्षांपासून पवार हे स्वप्न बाळगून देशाच्या राजकारणात वारत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी दिल्लीतील काही कोंबड्यांनी एकत्रित येऊन मोदींच्या विरोधात मोड बांधण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात काय तर “रात गेली हिशोबात ,पोरग नाही नशिबात अशी मिश्किल कोपरखळी मारत पवार पंतप्रधान होण्यावर आपली भूमिका स्पष्ट केली.