“हर घर तिरंगा” गीत लोकप्रिय! ; मुख्याधिकारी ‘कैलास केंद्रे’ यांची संकल्पना, सांगोला नगरपरिषदेचा उपक्रम

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती जागविणारा जाज्वलय इतिहास सांगोला नगरपरिषदेनी हार घर तिरंगा गीताने समोर आणला आहे. मुख्यधिकारी कैलास केंद्रे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले गीत युटयूब आणि सोशल मिडीयावर लोकप्रिय ठरत आहे.

  शेखर गोतसुर्वे, सोलापूर : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती जागविणारा जाज्वलय इतिहास सांगोला नगरपरिषदेनी हार घर तिरंगा गीताने समोर आणला आहे. मुख्यधिकारी कैलास केंद्रे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले गीत युटयूब आणि सोशल मिडीयावर लोकप्रिय ठरत आहे.

  सोलापूर जिल्हयातील सांगोला येथील कवी : कल्पेश कांबळे
  तालवाद्म: दिग्विजय जावीर
  रेकॉर्डींग अॅण्ड एडिटींग : आरोह स्टुडिओ
  संगीत / गायक :
  सुभाष (सोमनाथ) जगधने यांनी गीत तयार करण्यास परिश्रम घेतले आहे.

  १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचानाप्रमाणे सांगोला नगरपरिषदेकडून “हर घर तिरंगा” हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

  मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “हर घर तिरंगा” हा उपक्रम जनमानसात पोहोचविण्या करिता सांगोला नगरपरिषदेकडून अत्यंत सूक्ष्म नियोजन केले असून उपक्रमाचा प्रचार, प्रसार तसेच झेंड्याची उपलब्धता व विक्री अश्या दुहेरी आघाड्यांवर काम सुरू आहे.सांगोला नगरपरिषद मुख्याधिकारी केंद्रे यांनी बँकां, बचत गट, सामाजिक संस्था, व्यापारी संघटना व विविध आस्थापना यांच्या बैठका घेवून लोकवर्गणीतून ८ हजार झेंडे उपलब्ध करून घेवून कार्यालयीन अधीक्षक श्रीमती अभिलाषा निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली एकूण १० पथक गठीत करून घरोघरी जाऊन शहरात मोफत झेंडा वितरणाची व्यवस्था केली आहे. १ हजार ५०० कुटुंबांना मोफत झेंडा वाटपाचा पहीला टप्पा पार करण्यात आला आहे.

  हे अभियान यशस्वी होण्यासाठी प्रभावी प्रचार, प्रसार आवश्यक असल्याने नगरपरिषदे मार्फत “हर घर तिरंगा” हे गीत तयार केले असून हे गीत समाज माध्यमांवर लोकप्रिय होत आहे.सांगोला नगरपरिषद मार्फत प्रभातफेरी, पथनाट्ये, पोवाडे अश्या पारंपरिक पद्धती बरोबरच समाज माध्यमांचा प्रभावी वापर करून अभियानाचा प्रचार, प्रसार सुरू आहे.

  “हर घर तिरंगा” अभियानाच्या प्रभावी अंमलजावणीसाठी मुख्याधिकारी यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयीन अधीक्षक अभिलाषा निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली “तिरंगा टास्क फोर्स” गठीत केली असून यात लेखापाल विजयकुमार कहेरे, योगेश गंगाधरे, अमित कोरे, नयन लोखंडे, शरद चव्हाण यांचा समावेश आहे.विविध घटकांच्या आढावा बैठका घेणे, लोकवर्गणीतून झेंडे उपलब्ध करून घेणे,तिरंगा व्होलेनटीयर यांच्या नेमणुका करणे, अभियानात जास्तीत जास्त नागरिकांना जोडणे याची जबाबदारी या तिरंगा टास्क फोर्स वर सोपविली असल्याची माहिती केंद्रे यांनी दिली.

  ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या आठवणी जाग्या करून देशाभिमान जागृत करण्यासाठी सांगोला शहरातील प्रत्येक नागरिकाने १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर, दुकानावर, शासकीय तसेच खाजगी कार्यालयांवर ध्वज संहितेचे पालन करून नगरपरिषदे मार्फत उपलब्ध करून दिलेला तिरंगा फडकवून हर घर तिरंगा अभियान यशस्वी करायचे आहे.

  कैलास केंद्रे, मुख्याधिकारी, सांगोला नगरपरिषद