आरोग्य खात्याच्या परीक्षा रद्द, भाजप युवा मोर्चाचे सोलापुरात आंदोलन, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या प्रतिमेस मारले जोडे

‘आरोग्य विभागाच्या क व ड विभागाच्या परीक्षा सोलापुरात आयोजित केल्या होत्या. या परिक्षेसाठी लातूर, उस्मानाबाद, बीड, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांतील विद्यार्थी सोलापुरात काल शुक्रवारी दाखल झाले होते. पण ऐनवेळी रात्री सर्व परीक्षार्थीं विद्यार्थ्यांना मोबाईलवर मेसेज आला आणि परीक्षा रद्द झाल्याची माहिती मिळाली.'

  सोलापूर – आरोग्य खात्याच्या परीक्षा अचानक रद्द झाल्याने राज्यभर विद्यार्थ्यांचा संताप पहावयास मिळाला. सरकारच्या या भोंगळ कारभाराविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरातील बस स्थानकावर परीक्षार्थीं विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध केला.

  सोलापूर शहरात विविध शाळांत आरोग्य विभागाच्या क व ड वर्गाच्या परीक्षा आज शनिवारी होणार होत्या. पण, काल शुक्रवारी रात्री अचानकपणे सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द झाल्याचा मोबाईलवर मेसेज आला. अचानक परिक्षा रद्द झाल्याने जे विद्यार्थी परिक्षेसाठी इतर जिल्ह्यांत गेले होते त्यांची मोठी गैरसोय झाली. व आर्थीक नुकसान झाले. असं भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.

  इतर जिल्ह्यातील विद्यार्थी सोलापुरात दाखल; पण निराश होऊन घरी परतले

  ‘आरोग्य विभागाच्या क व ड विभागाच्या परीक्षा सोलापुरात आयोजित केल्या होत्या. या परिक्षेसाठी लातूर, उस्मानाबाद, बीड, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांतील विद्यार्थी सोलापुरात काल शुक्रवारी दाखल झाले होते. पण ऐनवेळी रात्री सर्व परीक्षार्थीं विद्यार्थ्यांना मोबाईलवर मेसेज आला आणि परीक्षा रद्द झाल्याची माहिती मिळाली. आरोग्य खात्याचे मंत्री राजेश टोपे हे शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन माहिती देतात अफवांवर विश्वास ठेवू नका आणि रात्री त्यांच्याच आदेशानुसार परीक्षा रद्द केली जाते. ही विद्यार्थ्यांची फसवणूक आहे.’ असा रोष व्यक्त करत विद्यार्थी निराश होऊन घरी परत जात होते.

  आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या प्रतिमेस जोडे मारून केला निषेध

  भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरातील बस स्थानकात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा निषेध केला. त्यांच्या प्रतिमेस जोडे मारून या विद्यार्थ्यांनी निषेध केला.