निलज परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशा

    करमाळा / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : करमाळापासून सात ते आठ किमी अंतरावर असलेल्या निलज गावात बुधवारी दुपारच्या दोनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.

    उसाची पिके पूर्णतः भुईसपाट झाली असून, त्याचा परिणाम उत्पादनावर होणार असल्याने येथील बळीराजाचे कंबरडे मोडले असल्याचे दिसून येते आहे. संपूर्ण कठीण उन्हाळ्यात हे उसाचे पीक संभाळले असल्याचे आताच्या या नुकसाईने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पहावयास मिळत आहेत.

    या परिसरातील शेतकऱ्यांशी संपर्क साधला असता आमच्या उसाचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.