
शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या भागातील नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करावेत, अशी मागणी राहुल भड व तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली होती.तहसीलदार संतोष शेरखाने यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी राजेंद्र भोसले यांनी गौडगाव भागातील पिकाची पाहणी करत, शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी राहुल भड, अनिल यादव, संजय भड, यशवंत शिंदे, जीवन भड, युवराज काजळे आदी शेतकरी उपस्थित होते.
बार्शी : बार्शी तालुक्यात गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे गौडगाव परिसरात सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील गौडगाव मंडळातील सोयाबीन पीक काढणीच्या अवस्थेत आलेले आहे, परंतु ६ ते ७ दिवसापासून सतत पावसामुळे पिकात पाणी साठले त्यामुळे पीक वाया गेले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या भागातील नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करावेत, अशी मागणी राहुल भड व तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली होती.तहसीलदार संतोष शेरखाने यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी राजेंद्र भोसले यांनी गौडगाव भागातील पिकाची पाहणी करत, शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी राहुल भड, अनिल यादव, संजय भड, यशवंत शिंदे, जीवन भड, युवराज काजळे आदी शेतकरी उपस्थित होते.