तीर्थक्षेत्र अक्कलकोटमध्ये उभारण्यात येणार अत्याधुनिक स्वागत कमान

तीर्थक्षेत्र अक्कलकोट प्रवेशद्वार येथे लवकरच 100 फूट लांबी आणि 55 फूट उंचीची अत्याधुनिक आकर्षक अशी भव्य स्वागत कमान उभारण्यात येणार आहे. पुणे येथील श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने ही भव्य स्वागत कमान उभी करुन देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र देशमुख यांनी दिली.

    अक्कलकोट : तीर्थक्षेत्र अक्कलकोट प्रवेशद्वार येथे लवकरच 100 फूट लांबी आणि 55 फूट उंचीची अत्याधुनिक आकर्षक अशी भव्य स्वागत कमान उभारण्यात येणार आहे. पुणे येथील श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने ही भव्य स्वागत कमान उभी करुन देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र देशमुख (Rajendra Deshmukh) यांनी दिली.

    श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशभरातून भाविक येतात. त्यांचे स्वागत आकर्षक कमानीने व्हावे, ही संकल्पना सहा महिन्यात पूर्ण होणार आहे. सगळ्या तीर्थक्षेत्राला आम्ही जाऊन आलो. अनेक ठिकाणी स्वागत कमानी होत्या. अक्कलकोटमध्ये मात्र पाहायला मिळाली नाही. त्यामुळे आम्ही स्वामींच्या गावी स्वागत कमान करायचा निर्णय घेतला. येत्या सहा महिन्यांत हे काम आम्ही पूर्ण करून देणार आहोत. राजेंद्र देशमुख, अध्यक्ष, स्वामी समर्थ प्रतिष्ठान, पुणे या पाठीमागे आहे. केवळ कमान उभारली जाणार नाही तर अक्कलकोटमध्ये ज्यावेळी भाविकांचा प्रवेश होतो, त्या चौकाचे सुशोभीकरण देखील या प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार आहे.

    पुणे येथील श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या 30 वर्षांपासून पुणे ते अक्कलकोट पायी पालखी सोहळा सुरु आहे. त्यावेळी ही बाब प्रकर्षाने दिसून आल्यानंतर प्रतिष्ठनाने हा निर्णय घेतला आहे. यावर सुमारे 30 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. अक्कलकोट शहरालगत सोलापूर रोडवर भव्य- दिव्य प्रवेशद्वार भाविकांचे लक्ष वेधून घेणार आहे. 100 फूट लांबी आणि 55 फूट उंच, संपूर्ण आरसीसी बांधकाम, त्यात श्री स्वामी समर्थ, श्री दत्त महाराज आणि चोळप्पा महाराज यांच्या मूर्ती असणार आहेत.