अवैधरित्या जनावरांची वाहतूक ; दोघांवर गुन्हा

संशयित आरोपी मिळून त्यांच्या ताब्यातील छोटा हत्ती वाहन क्रमांक एम.एच.१३.एएन.८६४७ या वाहनातून तीन जनावरे निष्काळजीपणाने व दाटीवाटीने बांधून कोणत्याही प्रकारचे वाहन परवाना न घेता ती जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असताना मिळून आले आहे.

    सोलापूर : अवैधरित्या जनावरांची वाहतूक केल्याची घटना दि.१९ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मरीआई चौक सोलापूर येथे घडली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कैलास मनोहर बागुल यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून सिद्धेश्वर दुर्योधन पळसे (वय-३५,रा.पंढरपूर) व रज्जब अब्दुल रहीम कुरेशी (वय-२२,रा.लष्कर,सतनाम चौक,सोलापूर) यांच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की,वरील संशयित आरोपी मिळून त्यांच्या ताब्यातील छोटा हत्ती वाहन क्रमांक एम.एच.१३.एएन.८६४७ या वाहनातून तीन जनावरे निष्काळजीपणाने व दाटीवाटीने बांधून कोणत्याही प्रकारचे वाहन परवाना न घेता ती जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असताना मिळून आले आहे.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक दराडे हे करीत आहेत.