theft

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ (Mohol Crime) येथील रमजान बागवान या फळविक्रेत्याच्या घरी बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.

    सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ (Mohol Crime) येथील रमजान बागवान या फळविक्रेत्याच्या घरी बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून (Theft) नेल्याची घटना घडली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

    मोहोळ शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांची गस्त वाढवावी व गुन्हेगांराचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, चोरट्यांनी गरड महाविद्यालयाजवळील मंदाकिनी रेसिडेन्सीमध्ये बाहेर लावलेल्या आठ ते दहा मोटारसायकलच्या पेट्रोल टाकीचे पाईप तोडून पेट्रोलही चोरून नेल्याचे निदर्शनास आले आहे. या घटनेचा पुढील तपास मोहोळ पोलीस करत आहेत.