
मंगळवेढा शहरात पाठीमागे दरोडेखोरांनी कुटुंबियांना गजाने मारून जखमी करीत दागिने ओरबडून नेल्याचा प्रकार ताजा असतानाच पुन्हा एका वृध्द महिलेच्या अंगावरील दागिने ओरबडून घेवून तीचा खून केल्याने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे.
मंगळवेढा : पडोळकरवाडी येथे दरोडेखोरांनी एका 65 वर्षीय वृध्देच्या अंगावरील 38 हजार रुपये किमतीचे दागिने ओरबडून घेवून तीचा खून केल्याची घटना घडली असून नकुशा कोंडीबा मदने असे खून झालेल्या वृध्द महिलेचे नाव आहे.दरम्यान अज्ञाताविरूध्द खून व दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी भेट देवून या घटनेमागील कारणमिमांसा जाणून घेतली.
या घटनेची हकिकत अशी,यातील फिर्यादी यशवंत कोंडीबा मदने (वय 61) यांची सावत्रआई तथा मयत नकुशा कोंडीबा मदने ही असून दि.6 रोजी रात्री 9.30 वा. जेवण करून ती स्वतंत्र रहात असलेल्या घरी झोपायला गेली. तीची अन्य मुले ऊसतोडीला गेल्यामुळे ती वृध्द महिला एकटीच कुडाच्या घरात रहात होती.तसेच तीने शेळयाही पाळल्या होत्या. दि.7 च्या सकाळी 9.00 वा. सदर शेळया ओरडू लागल्याने फिर्यादीची भावजय रत्नाबाई ही मयत नकुशाच्या घरी गेली असता दरवाजा लावलेला दिसला.दरवाजा उघडताच नकुशा ही झोपलेल्या जागेवर गप्प पडलेली दिसली. हे दृश्य पाहून ती ओरडू लागल्याने परिसरातील लोक गोळा झाले.व त्यांनी पाहिले असता नकुशा ही जागेवर मरून पडलेली व तीच्या उजव्या कानाच्या चोब्याजवळून रक्त येत असलेले व कानातील सोन्याची फुले,बोरमाळ,गंठण आदी दिसून आले नाहीत.दरोडेखोरांनी जवळपास 4 हजार रुपये किमतीची सोन्याची फुले, 14 हजार रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ,20 हजार रुपये किमतीचे गंठण असा एकूण 38 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल काढून घेवून तीला जीवे ठार मारले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.दरम्यान,या घटनेचे वृत्त समजताच पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते,डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून या घटनेमागील कारणे जाणून घेतली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे हे करीत आहेत.
मंगळवेढा शहरात पाठीमागे दरोडेखोरांनी कुटुंबियांना गजाने मारून जखमी करीत दागिने ओरबडून नेल्याचा प्रकार ताजा असतानाच पुन्हा एका वृध्द महिलेच्या अंगावरील दागिने ओरबडून घेवून तीचा खून केल्याने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे.वार्षिक तपासणीप्रसंगी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरिक्षक मनोज लोहिया यांनी मंगळवेढयात चोरीचे प्रमाण जास्त असल्याचे सांगितले होते. त्यानंतरही चोरीचे प्रमाण न थांबता वाढत गेल्याने चोरांनी आता त्यापुढेही जावून चक्क वृध्द महिलेचा खून केल्याने संतापजनक प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.पाठीमागील दरोडयातील चोरटयांना जेरबंद करण्यात पोलिसांना अदयापही यश आले नसताना पडोळकरवाडीतील त्या घटनेने आता पोलिसांनाच आव्हान दिले असून त्या खूनी दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश येणार का असा सवालही नागरिक करीत आहेत.