लाल बावटयाची राजकीय ताकद वाढवा : कॉ.आडम मास्तर

२३ व्या जिल्हा अधिवेशनाची सांगता ; माकप जिल्हा सचिव पदी अॅड. एम.एच.शेख यांची तिसऱ्यांदा फेरनिवड!

    सोलापूर : आगामी महानगर पालिका निवडणूक नजरे समोर ठेवून लाल बावटयाची राजकीय ताकद वाढवा असे आवाहन माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी केले. माकपच्या २३ व्या जिल्हा अधिवेशनातील सांगता समारोपा प्रसंगी ते बोलत होते. अॅड. एम.एच. शेख यांची कार्यक्रमा प्रसंगी जिल्हासरचिटणीस पदी तिसऱ्यांदा निवड करण्यात आली.

    पुढे बोलताना आडम मास्तर म्हणाले, सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असून महाराष्ट्रातील जनता या सरकारच्या कारभारावर असमाधानी आहे. तसेच सोलापूर शहराचा विकास ज्या गतीने होणे अपेक्षित आहे. त्या गतीने झालेले नाही. कारण सोलापूर महानगर पालिकेच्या सभागृहात शहराच्या विकासासंदर्भात चौफेर ज्ञान व चौफेर अभ्यास असणाऱ्या लोक प्रतिनिधींचा अभाव दिसून येतो. अशावेळी शहर संदर्भात माहिती व विकासाची दृष्टी असणारे लोकप्रतिनिधींच्या सहभागातून शहराचा विकास होत असतो. याकरिता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या व वतीने आगामी महापालिका निवडणुकीत किमान दोन अंकी नगरसेवक निवडून येतील अशी तयारी या अधिवेशनाच्या अनुषंगाने करावे तसेच येणाऱ्या विधान सभेत सोलापूर शहर मध्य मतदार संघातून लाल बावट्याचाच आमदार म्हणून निवडून येईल. अशी राजकीय ताकद वाढविण्याचा निर्धार करा. अशा शब्दात सोलापूर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या २३ व्या जिल्हा अधिवेशनात कार्यकर्त्यात ऊर्जा व नव्या जोमाने काम करण्याची उर्मी माकपाचे राज्य सचिव माजी आमदार कॉ. आडम मास्तर यांनी दिले.शिवछत्रपती रंगभवन येथे अधिवेशनाचा सांगता समारोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ.नरसय्या आडम (मास्तर) यांच्या मार्गदर्शनाने व राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. किसन गुजर यांच्या समारोप भाषणाने झाला.

    समारोप भाषणात कॉ. किसन गुजर म्हणाले कि, सोलापूर जिल्हा हा लढाऊ आणि क्रांतिकारी जिल्हा आहे. या जिल्ह्यातून पक्ष आणि जनसंघटना वाढीसाठी केंद्र आणि राज्य नेतृत्व या जिल्ह्यातून मिळाले. नेतृत्व गुण संघटना बांधणी आणि जन आंदोलन अधिक तीव्र करण्याची क्षमता कार्यकर्त्यात निर्माण करणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या दिशाहीन राजकारणाला योग्य दिशा देण्यासाठी सर्व कार्यकर्ते सक्रीय झाले पाहिजे. अशा शब्दात मार्गदर्शन केले. या अधिवेशनात अॅड.एम.एच.शेख यांनी मागील तीन वर्षाच्या कार्याचा आलेख प्रतिनिधी सत्रात सादर केले. तद्नंतर या अहवालावर प्रतिनिधींनी चर्चा करताना आपले व्यक्त केले. यावर सचिवानी सादर केलेल्या अहवालावर झालेल्या चर्चेला उत्तर दिले आणि अध्यक्ष मंडळाच्या वतीने सचिवांचा अहवाल एक मताने मंजूर करण्यात आले.

    २३-२४ फेब्रुवारी २०२२ कामगार संहिता विरोधी देशव्यापी संप यशवी करा, विडी कामगार वाचवा, रोजगार वाचवा, महाराष्ट्र राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा, शेतकऱ्यांचे आंदोलन व डॉ.अशोक ढवळे यांचे अभिनंदन, बेरोजगारी विरुद्ध तरुणांचा लढा तीव्र करा, महागाई आटोक्यात आणा, मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण लागू करा इत्यादी महत्वपूर्ण ठराव मांडून एक मताने मंजुरी देण्यात आली. पुढील तीन वर्षाच्या पक्षीय कामकाजासाठी नवीन समिती गठीत करण्यात आली. या समितीचे जिल्हा सचिव अॅड.एम.एच.शेख यांची तिसऱ्यांदा फेर निवड करण्यात आली.