मोहीते पाटील गट जि.प.सदस्यांचे अपात्र प्रकरण ; शितलदेवी मोहीतेपाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब

मोहीते पाटील गटातर्फे अॅड. दत्तात्रय घोडके, अॅड. नितीन खराडे यांनी २७ ऑगस्ट रोजी दाखल केलेल्या अर्जात जिल्हा परिषदेच्या ३६ नंबर अकलूज गटातून शीतलदेवी धैर्यशील मोहिते-पाटील निवडून आल्या आहेत. आता अकलूजला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याने तक्रारीतून त्यांचे नाव वगळण्यात यावे, अशी मागणी केली .

    सोलापूर :जिल्हा परिषदेच्या अकलूज गटाचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्याने या गटातून निवडून आलेल्या शीतलदेवी मोहिते-पाटील यांचे नाव वगळण्याबाबत दिलेला अर्ज मंगळवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी फेटाळून लावला. तक्रार याचिकेतून जिल्हाधिकारी यांनी नाव वगळण्यास नकार दिला आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसने मोहिते-पाटील गटाच्या सहा जिल्हा परिषद सदस्यांविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीवर पुढील सुनावणी २८ सप्टेंबर रोजी होणार आहे.जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी दरम्यान रा.काँ.व्हीप झुगारुन विरोधात मतदान केल्याने शीतलदेवी मोहिते-पाटील, स्वरूपाराणी मोहिते- पाटील, अरुण तोडकर, गणेश पाटील, मंगल वाघमोडे, सुनंदा फुले यांचे सदस्यत्व रद्द करण्याची तक्रार राष्ट्रवादीचे अध्यक्ष बळिराम साठे यांनी केली आहे.

    या प्रकरणात मोहीते पाटील गटातर्फे अॅड. दत्तात्रय घोडके, अॅड. नितीन खराडे यांनी २७ ऑगस्ट रोजी दाखल केलेल्या अर्जात जिल्हा परिषदेच्या ३६ नंबर अकलूज गटातून शीतलदेवी धैर्यशील मोहिते-पाटील निवडून आल्या आहेत. आता अकलूजला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याने तक्रारीतून त्यांचे नाव वगळण्यात यावे, अशी मागणी केली .

    यावर राष्ट्रवादीचे वकील अॅड. उमेश मराठे, अँड. इंद्रजित पाटील, अँड. बाबासाहेब जाधव यांनी केलेल्या युक्तिवादानंतर हा अर्ज फेटाळण्यात आला.मोहिते-पाटील गटाने २७ ऑगस्ट रोजी आणखी अर्ज दाखल केला होता. पहिल्या अर्जात त्यांनी या प्रकरणाची सुरुवातीपासून सुनावणी घ्या ,मागणी केली होती. हा अर्ज फेटाळल्यानंतर या निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले आहे. या अपीलावर उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी करणार, असल्याचे सांगण्यात आले.