दुर्दैवी घटना! आंतरराष्ट्रीय तलावारबाज खेळाडूचा शॉक लागून मृत्यू

ओंकार बलराज धजाल हे वालचंद महाविद्यालयात बी.ए.च्या प्रथम वर्गातील शिक्षण घेत असून आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. भारतातील मलेशिया,मुंबई व विविध राज्यातील स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला आहे.तलवारबाजी मध्ये त्याने सुवर्णपदक मिळवले आहे तसेच राजस्तरीय स्पर्धा मध्ये विजेते पदक मिळवले आहेत.

    सोलापूर : सोलापूरातील लष्कर परिसरात राहणारे तलवारबाज आंतरराष्ट्रीय खेळाडू ओंकार बलराज धजाल वय वर्षे १९ रा. धजाल बिल्डिंग लष्कर यांचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. बलराज हे आई वडिलांसोबत सोरेगाव परिसरातील डोणगाव रोड येथील शेतामध्ये फिरायला गेले होते. शेतातील पत्राशेड वर चढून नारळाच्या झाडावरून नारळ काढण्यासाठी गेले. नारळ ही त्याने काढली मात्र खाली उतरत असताना झाडा शेजारून गेलेल्या विजेच्या मेन लाइनचा शॉक ओंकार यांना बसला आणि ते जागेवरच खाली उभारलेल्या आई वडिलांसमोर बेशुद्ध पडला. उपचारासाठी आश्विनीहॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वी मयत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.ओंकार बलराज धजाल हे वालचंद महाविद्यालयात बी.ए.च्या प्रथम वर्गातील शिक्षण घेत असून आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. भारतातील मलेशिया,मुंबई व विविध राज्यातील स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला आहे.तलवारबाजी मध्ये त्याने सुवर्णपदक मिळवले आहे तसेच राजस्तरीय स्पर्धा मध्ये विजेते पदक मिळवले आहेत.

    इंडियन मॉडेल स्कूल येथे प्रशिक्षक म्हणून ही जात असल्याची माहिती मिळाली आहे. अवघ्या १९वर्षात सुवर्णंपदक मिळविलेल्या ओंकार जाण्याने क्रीडा क्षेत्रात व लष्कर परिसरात शोककळा पसरली आहे.सिव्हिल हॉस्पिटल येथे नातेवाईक व ओंकारच्या मित्रानी ओंकारला पाहण्यासाठी गर्दी केली होती.