‘या’ तालुक्यातील तहसीलदारांच्या बदलीचा ‘पेढे’ वाटून सामाजिक कार्यकर्त्यांकडून जल्लोष

पंढरपूर तहसीलदार म्हणून नेमणूक झाल्यापासून वैशाली वाघमारे यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली होती. अनेकदा फोन न उचलणे, विविध प्रकारचे दाखले वेळेवर न देणे, कार्यालयात वेळेवर उपस्थित न राहणे, यावरून अनेक सामाजिक संघटनांनी त्यांच्या विरोधात वरिष्ठ पातळीवर तक्रारी केल्या होत्या.

पंढरपूर: पंढरपूर शहर तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्या बदलीचे वृत्त समजताच अनेक सामाजिक सामाजिक कार्यकर्त्यांनी पेढे वाटून जल्लोष केला. शासकीय अधिकाऱ्यांच्या चांगल्या कर्तव्याने भारावलेली जनता नाराज झाल्याचे चित्र अनेकदा दिसते, मात्र बदलीनंतर आनंद व्यक्त होण्याचे चित्र पंढरीत प्रथमच दिसत आहे.
पंढरपूर तहसीलदार म्हणून नेमणूक झाल्यापासून वैशाली वाघमारे यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली होती. अनेकदा फोन न उचलणे, विविध प्रकारचे दाखले वेळेवर न देणे, कार्यालयात वेळेवर उपस्थित न राहणे, यावरून अनेक सामाजिक संघटनांनी त्यांच्या विरोधात वरिष्ठ पातळीवर तक्रारी केल्या होत्या. मात्र त्यांची बदली झाल्याचे वृत्त समजताच विठ्ठल मंदिराजवळ नामदेव पायरी येथे बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून जल्लोष केला. यापूर्वी अनेकदा पोलीस अधिकारी किंवा नगरपरिषद तसेच तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांना शहरातील नागरिकांनी विरोध केला होता. प्रसंगी मोर्चे ही काढले होते, मात्र पंढरपूर शहर तहसीलदारांच्या बदलीनंतर पेढे वाटून आनंद व्यक्त झाल्याने शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.