सोलापूर जिल्हयातील १५ लाख बालकांना जापनीज मेंदूज्वर लसीकरण

जिल्ह्यातील कोविड लसीकरणा बरोबरच जापनीज मेंदूज्वरचे लसीकरण सर्व केंद्रांवर राबून एक वर्ष ते पंधरा वर्षातील सर्व लाभार्थ्यांना १००% लसीकरण करण्याचे नियोजन तालुका आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले आहे.दोन वर्षांपूर्वीच्या मिजल्स रूबेला लसीकरणाचा अनुभव पाठीशी घेता आगामी काळातील जापनीज मेंदूज्वर लसीकरण आरोग्य यंत्रणा यशस्वी करेल असे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल कुमार जाधव यांनी दिली.

    सोलापूर : सोलापूर जिल्हयातील १ ते १५ वयो वर्षगटातील बालकांना जापनीज मेंदूज्वर लसीकरणाची सुरुवात ३ जानेवारी पासून करण्यात येणार आहे. आशी माहीती सीईओ दिलीप स्वामी यांनी दिली.जिल्हा परिषदेच्या यशवंत सभागृहात जापनीज मेंदूज्वर लसीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती.

    या बैठकीस गटशिक्षण अधिकारी बालविकास प्रकल्प अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधीक्षक वैद्यकीय अधिकारी व जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक उपस्थित होते.जिल्ह्यातील कोविड लसीकरणा बरोबरच जापनीज मेंदूज्वरचे लसीकरण सर्व केंद्रांवर राबून एक वर्ष ते पंधरा वर्षातील सर्व लाभार्थ्यांना १००% लसीकरण करण्याचे नियोजन तालुका आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले आहे.दोन वर्षांपूर्वीच्या मिजल्स रूबेला लसीकरणाचा अनुभव पाठीशी घेता आगामी काळातील जापनीज मेंदूज्वर लसीकरण आरोग्य यंत्रणा यशस्वी करेल असे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल कुमार जाधव यांनी दिली.

    या प्रशिक्षणकार्यशाळेसाठी जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, निवासी अधिकारी बाह्य संपर्क डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉक्टर अरुण काटकर अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रदीप राऊत जिल्हा माध्यम व अधिकारी रफिक शेख होते.