मार्डीच्या मोनाली नारायणकर यांना अर्थशास्त्र विषयात पी.एचडी. प्रदान

    सोलापूर : मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथील विद्यार्थिनी मोनाली मोहन नारायणकर-पोळ यांना नुकतीच पीएच.डी. प्रदान  करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथून अर्थशास्त्र विषयात ही पीएच.डी. पदवी त्यांनी प्राप्त केली. त्यांना प्रा. डॉ. जी. एस. कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

    ‘इकॉनॉमिक इन्कल्युजन ऑफ वूमन इन डेअरी फार्मिंग विथ स्पेशल रेफरन्स टू सोलापूर डिस्ट्रिक्ट’ या विषयात त्यांनी शोधप्रबंध सादर केला होता. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.