सिद्धरामेश्वराच्या पालखीवर मुस्लिम बांधवांनी केली गुलाबपुष्पवृष्टी; सोलापुरात सर्वधर्म समभावाची प्रचिती

  सोलापूर – सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे.सिद्धरामेश्वराचा योगदंड आणि पालखी जातं असताना सोलापुरातील छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड कडून सिद्धरामेश्वराच्या पालखीवर गुलाबपुष्पवृष्टी करण्यात आली आहे.900 वर्षांपूर्वी सर्वधर्म समभावाची सिद्धारमेश्वरांनी दिलेली शिकवण याचीच प्रचिती यामुळे सोलापूरमध्ये पहायला मिळतं आहे.
  प्रत्येक सिद्धेश्वर भाविकांच्या मना मनामध्ये निर्माण झालेल्या भक्तिरसाने ओथंबलेल्या सोन्नलगी नगरीमध्ये मंगळवारी सिद्धरामेश्वराच्या यात्रेलाप्रारंभ झाला आहे. यावेळी हर बोला हर्र श्री सिध्देश्वर महाराज की जय हर्र हर्र चा जयघोषाने वातावरण भक्तिमय झाली होती. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भूकैलासातील सोन्नलगीच्या सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेतील प्रमुख धार्मिक विधींना मंगळवारपासून प्रारंभ झाला.

  ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला सुमारे साडेनऊशे वर्षांची समृद्ध परंपरा असून मानाच्या सातही नंदीध्वज हे योग दंडाचे प्रतीक आहेत. पहिला नंदीध्वज हिरेहब्बू वाड्यात असून देवस्थानचा आहे तर दुसरा नंदीध्वज कसब्यातील देशमुखांचा आहे. रूढी, प्रथा, परंपरेनुसार कसब्यातील हिरेहब्बू वाड्यात मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या या दोन्ही नंदीध्वज यांची विधिवत पूजा करण्यात आली.

  12 जानेवारी यात्रेचा पहिला दिवस आहे. यन्नी मज्जन हा धार्मिक विधी करण्यात येतो. त्यामध्ये सकाळी ८.०० वाजता उत्तर कसबा येथिल श्री मल्लिकार्जुन देवळाजवळ असलेल्या हिरेहब्बू यांच्या निवास स्थानापासून काठयांची (नंदीध्वज) मिरवणूक निघते. त्याच दिवशी पुन्हा दुपारी १.०० वाजता श्री सिध्देश्वर मंदिरातून मिरवणूक निघून ६८ लिंगास योगदंडासह तैलाभिषेक करुन पुजा केली जाते. या काळात मिरवणुकीमध्ये मानकरी, नंदीध्वजधारक व भाविक मोठया प्रमाणात येऊन गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे ओमिक्रॉन व कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये याचा विचार करता यनींमज्जन या धार्मिक मिरवणुकीस परवानगी दिली नाही. त्येक नंदीध्वजा समवेत 5 व्यक्ती (एकूण ३५ व्यक्ती) तसेच त्यांच्या सोबत इतर १५ पुजारी व मानकरी असे मिळून एकूण ५० व्यक्ती यांना परवानगी देण्यात आली आहे.

  दोन डोस असलेल्याना मंदिरात प्रवेश

  १२ जानेवारी ते १६ जानेवारी या कालावधीत दर्शनाकरीता येणाऱ्या भाविकांकरीता ऑनलाईन दर्शन पासची सुविधा मंदिर समिती उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तसेच दर्शनाकरीता सकाळी ८.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत एकावेळी फक्त ५० भाविकच मंदिर परिसरात असतील याची दक्षता मंदिर समिती घेईल. दर्शनाकरीता येणाऱ्या भाविकांचे लसीचे २ डोस झालेले असावेत. यात्रा कालवधीत श्री सिध्देश्वर मंदिर भाविकांना केवळ मुखदर्शनासाठी खुले राहिल.