निमगावची सायकल बॅंक ठरली ५० मुलींचा आधार!

निमगावची मुलींसाठीची सायकल बॅंक सोलापूर जिल्ह्सात प्रेरणादायी आहे असे मत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले.शाळा स्वच्छ सुंदर झाल्या. जिल्हयात लोकवर्गणी तून साडे सहा कोटी रूपये जमा झाले. निमगाव ची सायकल बॅंक महत्वाची आहे.

    सोलापूर : माळशिरस तालुक्यांतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने साडे आठ लाख रूपये लोकवर्गणी तून सायकल बॅंक उभारली आहे. सिईओ दिलीप स्वामी यांनी स्वत एक सायकल महिन्या पुर्वी देऊन सायकल बॅकेची मुहूर्तमेढ रोवली. बघतां बघतां ५० सायकली जमा झाल्या. आज कार्यक्रमात लोकांचा सहभाग पाहून आमदार राम सातपुते यांनी दहा लाख रूपये स्वच्छ सुंदर शाळा साठी जाहिर केले. माळशिरस तालुक्यांतील निमगाव येथे आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने स्वच्छ व सुंदर शाळा अंतर्गत व आझादी का अमृत महोत्सवा निमित्त सायकल बॅकेचे उदघाटन आमदार राम सातपुते व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे हस्ते करणेत आले. या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी आमदार राम सातपुते, पंचायत समिती सभापती शोभा साठे, जिल्हा परिषद सदस्या ज्योती पाटील, उप सभापती प्रतापराव पाटील, माजू सदस्य के. के . पाटील , जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, जिल्हा लस अधिकारी डाॅ. पिंपळे, सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी पाटील , सरपंच आरती पाटील, उप सरपंच नंदकुमार पाटील, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आप्पा जाधव, गावातील जेष्ठ नागरिक प्रभाकर आप्पा पाटील उपस्थित होते.

    सायकल बॅंक सोलापूर जिल्ह्सात प्रेरणादायी – सिईओ दिलीप स्वामी
    निमगावची मुलींसाठीची सायकल बॅंक सोलापूर जिल्ह्सात प्रेरणादायी आहे असे मत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले.शाळा स्वच्छ सुंदर झाल्या. जिल्हयात लोकवर्गणी तून साडे सहा कोटी रूपये जमा झाले. निमगाव ची सायकल बॅंक महत्वाची आहे. जिल्हा परिषद सदस्य ज्योती पाटील यांचे संकल्पनेतून आकारास आलेली ही सायकल बॅंक महत्वपुर्ण आहे. जिल्हयात सायकल बॅंक प्रेरणादायी ठरणार आहे. मदतीचा हात पुढे करावा. आम्हीगुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले आहेत. निबंध स्पर्धा घेतल्या. दीडशे निबंधाचे वाचन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थांची गुणवत्ता वाढवायची असेल तर शिक्षकांची देखील गुणवत्ता वाढविली पाहिजे. १०२८ गावे अधिकारी यांची गावे म्हणून ओळखली पाहिजेत.
    ही मोठी संधी आहे. आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका यांचे योगदान महत्वाचे आहे. बालसंजीवनी चा उपक्रम सुरू आहे. औषधोपचार विमा बालक मरू नये. पालकांचे जीव वाचविणेसाठी७५ आरोग्य केंद्रामघ्ये उपक्रम घेतोय. १० लाख बालकांची तपासणी करणारा सोलापूर जिल्हा हा एकमेव आहे.

    स्वच्छ व सुंदर शाळेस दहा लाखाची मदत- आमदार राम सातपुते
    निमगाव येथील शाळेस आमदार राम सातपुते यांनी दहा लाख रूपये मदत केली. स्वच्छ सुंदर शाळा हा उपक्रम जिल्ह्सात चांगला उपक्रम राबविला आहे. या उपक्रमा साठी विधानसभेत अभिनंदनाचा ठराव केला पाहिजे असा स्तुत्य उपक्रम आहे. जिल्हा परिषद व शिक्षण विभागाने राबविलेला उपक्रम स्तुत्य आहे. असेही आमदार राम सातपुते यांनी सांगितले सुत्रसंचालन सुहास उरवणे यांनी केले. मुख्याध्यापक सरवदे यांनी आभार मानले.