येत्या दोन वर्षात टॅक्स वाढवणार नाही : धैर्यशील जाधव

नगरपरिषद झाली की भरमसाठ टॅक्स वाढतील या भीतीने अकलूजकर धास्तावले होते. पण आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी येत्या दोन वर्षांत कोणत्याही प्रकारचे टॅक्स वाढवले जाणार नाहीत. पण सन २०२३-२४ मध्ये टॅक्समध्ये थोङीशी वाढ होईल हे स्पष्ट केल्यामुळे अकलूजकरांसाठी ही खुशखबरच ठरली आहे. 

    अकलूज : नगरपरिषद झाली की भरमसाठ टॅक्स वाढतील या भीतीने अकलूजकर धास्तावले होते. पण आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी येत्या दोन वर्षांत कोणत्याही प्रकारचे टॅक्स वाढवले जाणार नाहीत. पण सन २०२३-२४ मध्ये टॅक्समध्ये थोङीशी वाढ होईल हे स्पष्ट केल्यामुळे अकलूजकरांसाठी ही खुशखबरच ठरली आहे.

    धैर्यशील जाधव म्हणाले, सन २०२१-२२ साठी नगर परिषदेचे अंदाजपत्रक सुमारे २०० कोटी रुपयांचे असेल. सध्याची असलेली पाणी पुरवठा योजना शहरासाठी कमी पङत आहे. विझोरी येथील तलावाची साठवण क्षमता अपुरी असल्यामुळे नागरिकांना कमी प्रमाणात पाणी उपलब्ध होते. त्यासाठी जुन्या तळ्याची खोली वाढवणे, अस्तरीकरण करणे, विस्तारीत तळ्यासाठी जागा उपलब्ध करणे, ७७ मैलातून पाणी उचलून साठवण क्षमता वाढवणे असे नियोजन आहे. त्यासाठी सुमारे ८५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. शहरातील नळांना अल्ट्रासोनिक मिटर बसवून प्रती पैसा १ लिटर पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे. यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्याबारोबर चर्चा केली असल्याचे जाधव यांनी सांगितले.

    भूमिगत गटारे, मलनिस्सारण योजनेचा प्रस्ताव मांङला असून, घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करुन, कचऱ्यापासून खत निर्मिती करणार आहोत. त्यासाठी २० अतिरिक्त घंटा गाङ्यांची तरतूद करण्यात येईल.